घरमनोरंजनन्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहने केला खुलासा

न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहने केला खुलासा

Subscribe

रणवीर सिंहने आधी 29 ऑगस्ट रोजी आपलं जवाब नोंदवला होता. मुंबईतील चेंबुर पोलिस स्टेशनमध्ये जवळपास 2 तासापर्यंत रणवीर सिंहचा जवाब नोंदवण्यात आला होता.

मागील अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला त्याच्या न्यूड फोटोशूट प्रकरणात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. न्यूड फोटशूटनंतर रणवीर सिंहवर सोशल मीडियावर अनेकजण ट्रोल करत आहेत. मुंबईतील चेंबुर परिसरातून रणवीर सिंहवर या फोटोशूट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात रणवीर सिंहने देखील आपली बाजू मांडली आहे. आपला जवाब नोंदवताना रणवीर सिंहने पोलिसांसमोर दावा केला की, त्याने केलेल्या फोटोशूटमध्ये जेवढे फोटो आहेत. त्यांपैकी एका फोटोमध्ये त्याला मोर्फ करण्यात आलं आहे. रणवीर सिंहने सांगितलं की, ते त्याप्रकारे शूट करण्यात आलं नव्हतं ज्याप्रकारे ते दाखवलं जात आहे. रणवीर सिंहने पोलिसांकडे आपला जबाव नोंदवला. आता पोलिस या गोष्टीची पडताळणी करतील.

रणवीर सिंहने आधी 29 ऑगस्ट रोजी आपलं जवाब नोंदवला होता. मुंबईतील चेंबुर पोलिस स्टेशनमध्ये जवळपास 2 तासापर्यंत रणवीर सिंहचा जवाब नोंदवण्यात आला होता. त्यावेळी आपली बाजू मांडताना रणवीर सिंहने सांगितलं होतं की, त्याला या गोष्टीचा अंदाज देखील नव्हता की, अशा फोटोशूटमुळे इतक्या मोठ्या गोष्टी होतील. कोणाच्या भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता.

- Advertisement -

रणवीर सिंहला विचारण्यात आले हे प्रश्न
रणवीर सिंहला पोलिसांनी अनेक प्रश्न विचारले होते. रणवीरचा न्यूड फोटोशूटचा करार कोणत्या कंपनीसोबत झाला. फोटोशूट कधी आणि कुठे करण्यात आलं. अशा प्रकारच्या फोटोशूटमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. याचा अंदाज तुम्हाला होता का?

चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने केली होती तक्रार
रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्या स्वयंसेवी संस्थेच्या मते, “भारत संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला नायक म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांना फॉलो करतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये. असं तक्रारीत चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने म्हटले होते. या संस्थेने रणवीर सिंहवर कलम 292, 293, 345 आणि 509, 67 A हे कलम लावले होते.


हेही वाचा :

न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहने मांडली बाजू; अडीच तास चालू होती चौकशी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -