रणवीर सिंह, अल्लू अर्जुनचा चाहता; SIIMA 2022 मध्ये रणवीरने केला श्रीवल्ली गाण्यावर डान्स

अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा, कमल हासन आणि यश या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिसून आले. सोबतच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने सुद्धा या सोहळ्यात हजेरी लावली होती.

बंगुळुरूमध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारांना SIIMA 2022 या नावाने देखील ओळखले जाते. या सोहळ्यात साउथमधील अनेक कलाकारांचे त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी कौतुक करण्यात आले. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांचे अनेक कलाकारही या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिसून आले. यांमध्ये अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा, कमल हासन आणि यश या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिसून आले. सोबतच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने सुद्धा या सोहळ्यात हजेरी लावली होती.

रणवीर म्हणाला पुष्पाचा डायलॉग

SIIMA 2022 मध्ये रणवीर सिंहला सुद्धा एक पुरस्कार जाहिर झाला. अशातच पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. यामध्ये काही व्हिडीओ रणवीर सिंह मस्ती करताना आणि नाचताना दिसत आहे. सोबतच पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध डायलॉग सुद्धा बोलताना दिसत आहे. रणवीर सिंहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शनिवारी रणवीर सिंह बंगळुरू एअरपोर्टवर दिसला होता. त्यानंतर काही तासानंतर SIIMA 2022 च्या मंचावर तो दिसला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये रणवीर सिंहने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरला सुप्रसिद्ध हिंदी अभिनेता या साऊथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मंचावर रणवीर सिंह आणि अल्लू अर्जुन एकमेकांसोबत गप्पा मारत असल्याचं दिसून आलं. सोबतच त्याने पुष्पा स्टाईलमध्ये चालून दाखवलं, शिवाय पुष्पातील डायलॉग सुद्धा बोलून दाखवला. प्रेक्षकांमध्ये बसलेला अल्लू अर्जुन देखील रणवीर सिंहच्या डायलॉगने प्रभावित झाला.

इतकंच नव्हे तर रणवीर सिंहने त्यावेळी श्रीवल्ली गाण्यावरही डान्स केला. रणवीरचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.


हेही वाचा :

‘शहीद शिरीषकुमार’ चित्रपट रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज