‘अपना टाईम आएगा’-रणवीर सिंगचे खास GIF आणि स्टिकर्स सोशल मीडियावर

हे रणवीरचे स्टिकर्स आणि GIF फक्त भारतातच नाही तर, जगभरातील त्याच्या चाहत्यांना वापरता येणार आहे.

ranveer singh
रणवीर सिंह

‘अपना टाईम आएगा’असा डायलॉग म्हणत रणवीर सिंहने त्याच्या चाहत्यांसह सगळ्यांनाच वेड लावले आहे. कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये अभिनेता रणवीर सिंगने आपली ओळख निर्माण केली. सिंबा, गल्ली बॉय, बाजीराव मस्तानी यांसारखे सिनेमा असो किंवा रामलीला अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वेगळ्या अभिनय शैलीमुळे आणि अनोख्या अंदाजामुळे रणवीर सतत चर्चेचा विषय ठरत असतो. त्याने यंदाच्या ‘हॅलो! हॉल ऑफ फेम’ या पुरस्कार सोहळ्यातही ‘सुपरस्टार ऑफ द इअर’चा किताब त्याने पटकावला.

रणवीरने हे खास स्टिकर्स आणि GIF

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यामच्या यादीत स्वतःचं स्थान निर्माण करणारा रणवीर एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे चक्क रणवीरने स्वतःचे स्टिकर्स आणि GIF तयार करून घेतले आहे. रणवीरला आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधायला नेहमीच आवडते म्हणूनच रणवीरने हे खास स्टिकर्स आणि GIF बनवून घेतले आहे. हे रणवीरचे स्टिकर्स आणि GIF फक्त भारतातच नाही तर, जगभरातील त्याच्या चाहत्यांना वापरता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

GIFS @giphy

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

‘८३’ मधून रणवीर प्रेक्षकांच्या भेटीला

रणवीर सिंग सध्या त्याच्या येणाऱ्या चित्रपट ‘८३’यामध्ये व्यग्र असून हा रणवीरचा सिनेमा १० एप्रिल २०२०ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. भारताच्या इतिहासामध्ये २५ जून १९८३ ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे १९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून सध्या रणवीर कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवत आहे.