Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन संजय लीला भन्साळीच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंह झळकणार 'बैजू बावरा' च्या भूमिकेत?

संजय लीला भन्साळीच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंह झळकणार ‘बैजू बावरा’ च्या भूमिकेत?

'स्पॉटबॉय'ने दिलेल्या माहितीनूसार रणवीर सिंहचे नाव फायनल करण्यात आले

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)सध्या त्यांच्या आगामी ड्रीम प्रोजेक्ट ‘बैजू बावरा ‘ (Baiju Bawra) यावर काम करत असून, बॉलिवूडमध्ये याची जोरदार चर्चा रंगत आहे. संजय लीला भन्साळी यांनी ‘बैजू बावरा’ या सिनेमाची घोषणा 2019 मध्ये केली होती. यानंतर या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये कोणत्या कलाकाराची वर्णी लागणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. अशातच अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला सिनेमात काम करण्याची ऑफर देण्यात आली होती पण त्याने ही ऑफर धूडकावून लावल्यानंतर अभिनेता कर्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) विचार सिनेमाचे मेकर्स करत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण नुकतच मिळालेल्या माहितीनूसार संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंह पुन्हा एकदा एकत्र येत असून  (Ranveer Singh) रणवीर ‘बैजू बावरा’ या सिनेमात झळकणार आहे.’स्पॉटबॉय’ने दिलेल्या माहितीनूसार रणवीर सिंहचे नाव फायनल करण्यात आले आहे. रणवीर सिंहने यापुर्वी सुद्धा संजय लीला भन्साळीसोबत 3 सुपरहिट सिनेमात काम केलं आहे.

‘बैजू बावरा’ सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी संजय लीला भन्साळी दीपिका पादुकोणचा विचार करत आहे. सध्या ‘बैजू बावरा’ या सिनेमात  कोणत्या कलाकारांना संजय लीला भन्साळी सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे याची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाहीये. तसेच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नुकतच ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या सिनेमाची शूटींग पुर्ण केलं आहे. यानंतर ते ‘हीरा मंडी’ सिनेमाच्या कास्टींगमध्ये व्यस्त असल्याचे कळतेय. आता संजय लीला भन्साळी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट बैजू बावरा’ मध्ये कोणत्या कलाकाराची वर्णी लागणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


- Advertisement -

हे हि वाचा – IPL सट्टेबाजी पासून ते बिटकॉईन फ्रॉड, राज कुंद्रावर झाले आहेत गंभीर आरोप

- Advertisement -