घरमनोरंजनरणवीर सिंह बेस्ट पती.... व्हायरल व्हिडीओमुळे चाहते करतायत कौतुक

रणवीर सिंह बेस्ट पती…. व्हायरल व्हिडीओमुळे चाहते करतायत कौतुक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही तासांपूर्वी एक पोस्ट शेअर करत दीपिका-रणवीरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. दरम्यान, या आनंदाच्या बातमीनंतर दोघही जामनगरमध्ये अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये पोहोचले आहेत. जामनगरला पोहोचण्याआधी हे दोघेही मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तसेच दीपिका-रणवीरचा जामनगरमध्ये पोहोचल्यानंतरचा देखील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रणवीर पत्नी दीपिकाला गर्दीपासून वाचवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

हा व्हिडीओ पाहून अनेकजण रणवीरचं खूप कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकजण रणवीरला बेस्ट पती म्हणत आहेत.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरूवात

प्री-वेडिंग फंक्शनची सुरूवात आज 1 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजता कॉकटेल पार्टीने होईल. यानंतर 2 मार्च रोजी दोन कार्यक्रम होतील. एका कार्यक्रमाचे नाव ‘अ वॉक ऑन द वाइल्ड साईड’ आणि दुसऱ्याला ‘मेला’ असे असणार आहे. ‘अ वॉक ऑन द वाइल्ड साईड’साठी पाहुण्यांना असा पोशाख घालावा लागेल ज्याची थीम जंगलाशी जुळती असेल. 3 मार्च रोजी पाहुण्यांसाठी लंच आणि डिनरचे आयोजन केले जाईल, जिथे त्यांना 2500 हून अधिक पदार्थ दिले जातील.

- Advertisement -

‘हे’ कलाकारही राहणार उपस्थित

बॉलिवूड कलाकार शाहरुख खान , अमिताभ बच्चन, जान्हवी कपूर यांच्यासह काही हॉलिूवूड सेलिब्रिटी आणि व्यावसायिक देखील लग्नात सहभागी होणार आहेत. या यादीमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, ब्लॅक रॉक सीईओ लॅरी फिंक, फेसबुक मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, डिस्ने सीईओ बॉब इगर, हॉलिवूड गायिका रिहाना यांचा समावेश आहे. तसेच अनंत आणि राधिका जुलै 2024 मध्ये लग्न करणार आहेत.

 


हेही वाचा : ‘चार वर्षानी येणारा तुझा वाढदिवस…’ मृणाल कुलकर्णींची लेकासाठी खास पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -