Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रणवीरची हेअरस्टाईल पाहून नेटकऱ्यांना आले हसू, रणवीरचा एअरपोर्ट लूक व्हायरल !

रणवीरची हेअरस्टाईल पाहून नेटकऱ्यांना आले हसू, रणवीरचा एअरपोर्ट लूक व्हायरल !

रणवीर नेहमीच त्याच्या लुक सोबत एक्सपीरिमेंट करत असतो. अनेकदा त्याला या फनी लुकमुळे नेटकऱ्यांच्या टिकेला देखिल सामोरे जावे लागते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड (bollywood)अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh)त्याच्या अभिनया व्यतीरीक्त त्याने केलेल्या अतरंगी स्टाईलमुळे(ranveer singh style) जास्त लाइम लाइटमध्ये असतो. रणवीरने केलेल्या प्रत्येक लुकची चर्चा सोशल मीडियावर तसेच बी-टाउनमध्ये विशेष रंगताना दिसते. रणवीरला नुकतच एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान रणवीरने निळ्या रंगाचा एक कोट घातला आहे. मात्र रणवीरने आतमध्ये शर्ट किंवा टि-शर्ट परिधान न करता फक्त हा कोट घातला आहे. तसेच  मॅचिंग निळ्या रंगाचा मास्क घातला आहे आणि यासोबतच काळ्या रंगाचा स्टायलिश चश्मा देखील घातला आहे. (ranveer singh new look viral with 2 ponytail and coat without shirt)मात्र रणवीर त्याचा अतरंगीपणाचा खास टच या लूकला द्यायला अजीबात विसरला नाही. रणवीरच्या एअरपोर्ट एंट्रीनेच त्याने केलेल्या हेअरस्टाईलने सर्व कॅमेरामॅनचे लक्ष वेधून घेतले मग काय सोशल मीडियावर पुन्हा एकदा रणवीर छा गया असं म्हणायला हरकत नाही. काही नेटकऱ्यांनी रणवीरच्या या लूकची खिल्ली उडवली तर अनेकांना हा लूक भलताच पसंतीस पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

- Advertisement -

रणवीर नेहमीच त्याच्या लुक सोबत एक्सपीरिमेंट करत असतो. अनेकदा त्याला या फनी लुकमुळे नेटकऱ्यांच्या टिकेला देखिल सामोरे जावे लागते. आताही रणवीरच्या या लुक्सवर सोशल मीडीयावर प्रंचड मीम्स व्हायरल होत आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी रणवीरच्या या भन्नाट लूकला पसंती दर्शवली आहे.

- Advertisement -

रणवीरच्या वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास जोकर,सर्कस,रॉकी और राणी कि प्रेम कहानी , सुर्यवंशी सारख्या सिनेमात रणवीर झळकणार आहे तसेच रणवीर सिंग शेवटच्या वर्षी गली बॉय या चित्रपटात 2019 मध्ये दिसला होता. कोरोनाने त्याच्या चित्रपटांच्या रिलीजचे गणित बिघडवले. त्याच्या ’83’ या बहुचर्चित चित्रपटाचे रिलीज अजून बाकी आहे आणि चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. रणवीर ’83’ चित्रपटात कपिल देवची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याची पत्नी दीपिका पदुकोणही दिसणार आहे.


हे हि वाचा – Kanta Laga:’कांटा लगा’ गाण्यामध्ये नेहा, टोनी आणि योयोचा अनोखा स्वॅग!

- Advertisement -