घरमनोरंजनसिद्धू सुपरस्टार आहे - रणवीर सिंग

सिद्धू सुपरस्टार आहे – रणवीर सिंग

Subscribe

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची मैत्री तर सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मराठमोळा सिद्धु रणवीर सिंग सोबत आगामी सर्कस या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त एका कार्यक्रमात रणवीरने आपल्या सिद्धूचे तोंडभरून कौतुक केले.

“सिद्धू सोबतचा माझा हा दुसरा सिनेमा असून, त्याच्यासारखा टेलेंटेड कलाकार मी आयुष्यात यापूर्वी क्वचितच पाहिला असेल. असं म्हणतात की, कलाकाराचा चांगुलपणा हा पडद्यावर झळकतोच, सिद्धूने आजवर जे प्रेम मिळवलय, याचे कारण म्हणजे तो माणूसच तसा आहे. तो एक खूप चांगला, स्वच्छ मनाचा आणि प्रेमळ असा माणूस आहे, ज्याच्यासोबत काम करावस वाटेल, सिद्धार्थ सुपरस्टार आहे” या शब्दांत त्याने सिद्धार्थचे कौतुक केले. सिध्दार्थ ने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला असून रणवीर चे आभार मानले आहेत.

- Advertisement -

यापूर्वी देखील सिध्दार्थच्या बालभारती सिनेमा दरम्यान रणवीर ने सिद्धार्थ ला शुभेच्छा दिल्या होत्या.
रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या सिनेमात रणवीर सिंग मुख्य भुमिकेत आहे. तर इतरही अनेक कलाकार आहेत. मात्र यात मराठी कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळते. त्यात आपला मराठमोळा सिद्धार्थ जाधव नेहमीप्रमाणे भाव खाऊन जाणार हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -