बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट केले आहे. ज्यानंतर २०१८मध्ये दोघांनी लग्न केले. इंडस्ट्रीमध्ये फेवरेट कपलपैकी हे एक कपल आहे. सोशल मीडियावर दोघे नेहमी एकमेकांना पोस्ट लिहित असतात. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाला जवळपास तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. रणवीर नुकतंच आपल्या फॅमिली प्लॅनिंगबाबत खुलासा केला आहे.
दरम्यान रणवीर सिंग टेलिव्हिजन दुनियेत पदार्पण केले आहे. रणवीरचा ‘द बिग पिक्चर’ हा शो कलर्स चॅनलवर आजपासून सुरू झाला आहे. यातील एका सदस्यासोबत फॅमिली प्लॅनिंगबाबत बोलताना रणवीर सिंग एक मोठा खुलासा केला आहे. रणवीर सिंग म्हणाला की, २ ते ३ वर्षात आम्हाला मुलं होतील. मलाही एक गोंडस बाळ कोणीतरी दिले तर आयुष्य सेट होईल. मी मुलांची नावे शॉर्टलिस्ट करत आहे. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी सूर्यवीर सिंह नाव ठेऊ का?’
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग नेहमी सोशल मीडियावर एकमेकांच्या कामावर प्रतिक्रिया देत असतात. क्विझ शो दरम्यान रणवीर सिंगने पत्नी दीपिकाचे कौतुक केले आणि सांगितले की, ‘तिने मला टीव्हीवर पदार्पण करण्यासाठी प्रेरित केले आहे.’ रणवीर पुढे सांगितले की, ‘शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी खूप अस्वस्थ आणि उत्सुकही होतो. दीपिकाने मला फूल पाठवली आणि एक स्वतःच्या हाताने लिहून एक नोट पाठवली. त्यामध्ये तिने मला शोसाठी विश केले होते.’
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच रणवीर सिंगचा कबीर खानचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘८३’ प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी रणवीरचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे. दिवाळीच्यानिमित्ताने हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरीन कॅफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय या चित्रपटात अजय देवगण देखील दिसणार आहे.