रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी 119 कोटींमध्ये खरेदी केलं नवं घर

रणवीर सिंहने हे घर ११९ कोटींना खरेदी केलेलं आहे. इतकंच नव्हे तर ही अपार्टमेंट शाहरूख खानचा मन्नत आणि सलमान खानचा गॅलेक्सी बंगल्याच्या मध्यावर आहे

बॉलिवूडचं प्रसिद्ध आणि पॉवर कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण आता लवकरच अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खानचे शेजारी होणार आहेत. रणवीर सिंहने सागर रेशम रेजडेंशियल टॉवरमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे. या घरामधून त्यांना बँडस्टॅण्ड आणि सुंदर अरबी समुद्र पाहता येईल.

रणवीर-दीपिकाचं नवीन आलिशान घर

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर सिंहने एक नवीन घर खरेदी केलं आहे. मात्र या अर्पाटमेंटचे अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाही. त्यांनी ज्या अपार्टमेंटची बोलणी केली आहे, तिथून अरबी समुद्राचे सुंदर दृष्य पाहता येतं. सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीर सिंहने हे घर 119 कोटींना खरेदी केलेलं आहे. इतकंच नव्हे तर ही अपार्टमेंट शाहरूख खानचा मन्नत आणि सलमान खानचा गॅलेक्सी बंगल्याच्या मध्यावर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीर सिंहचं नवं घर टॉवरच्या 16,17,18, आणि 19 व्या मजल्यावर असणार आहे. यामध्ये ऐकूण 11,299 वर्ग फूटचा एरिया असणार आहे आणि 1,300 वर्ग फूटाचे टेरेस असणार आहे. त्याबरोबरच इथे पार्किंग सुद्धा असणार आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या नव्या घराच्या जवळच शाहरूख खानचा मन्नत बंगला आहे. हे घर शाहरूखने बऱ्याच वर्षांपूर्वी 13 कोटींना खरेदी केलं होतं आणि त्याची किंमत आता 350 कोटी आहे.


हेही वाचा :शुक्रवारीच का होतात चित्रपट प्रदर्शित? हिंदी चित्रपटांपासून झाली होती सुरुवात