‘द इनकारनेशन : सीता’ सिनेमात रणवीर सिंगची एंट्री, साकारणार रावणाची भूमिका

Ranveer Singh to play Ravana in Alaukik Desai's 'Sita' starring Kangana Ranaut
'द इनकारनेशन : सीता' सिनेमात रणवीर सिंगची एंट्री, साकारणार रावणाची भूमिका

बॉलिवूडमधील बहुचर्चित ‘द इनकारनेशन : सीता’ या सिनेमात अभिनेत्री कंगना रणौत पाठोपाठ आता अभिनेता रणवीर सिंगची एंट्री झाली आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठी यापूर्वी अनेक अभिनेत्रींची नावं समोर आली. पण आता अभिनेत्री कंगना रणौतच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे. नुकतंच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाविषयी घोषणा केली. तर आता अभिनेता रणवीर सिंग मुख्य रावणाची भूमिका साकारणार आहे.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ‘द इनकारनेशन : सीता’ चित्रपटासाठी निर्मात्यांनी रणवीरला लंकेश रावणाची भूमिका साकरण्यासाठी विचारणा केली होती. मे महिन्यातच या चित्रपटाची ऑफर रणवीरला करण्यात आली,. ज्यानंतर रणवीर आणि निर्मात्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. मात्र रणवीर सिंग सध्या चित्रपटाच्या नरेशनच्या प्रतीक्षेत आहे.

मात्र एका रिपोर्टनुसार, या चित्रपटातील रावणाऱ्या भूमिकेसाठी रणवीर फारचं उत्सुक आहे. सीता हा चित्रपट बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट असणार आहे. ज्यात बाहुबलीच्या भव्यदिव्य सेट्सप्रमाणे सेट वापरले जाणार आहेत. या चित्रपटातील संवाद आणि लिरिक्स मनोज मुंतशिर यांनी लिहिलेत. तर सलोनी आणि अंशिता देसाई या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सीता चित्रपटाशिवाय रणवीर सिंगकडे अनेक बड्या प्रोजक्टच्या ऑफर्स आहेत. रणवीरने नुकतंच करण जौहरचा ‘रॉकी’ और ‘रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू केल आहे. याशिवाय तो ’83’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री करीना कपूर आणि दीपिका पादूकोनचे नावं चर्चेत होते. मात्र कंगनाने नाव या रोलसाठी निवडण्यात आले. मात्र या भूमिकेवर बॉलिवूडमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.