सुपरहिट दक्षिणात्य चित्रपट ‘अन्नियन’च्या हिंदी रिमेक मध्ये झळकणार रणवीर सिंग

या चित्रपटातील रणवीरची भूमिका त्याच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असणार हे नक्की. हा चित्रपट सुपरहिट दक्षिणात्य चित्रपट 'अन्नियन'चा हिंदी रिमेक असणार आहे.

बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग आता लवकरच एका हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एका मोठ्या दक्षिणात्य सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेक मध्ये रणवीर दिसणार आहे. या चित्रपटातील रणवीरची भूमिका त्याच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असणार हे नक्की. हा चित्रपट सुपरहिट दक्षिणात्य चित्रपट ‘अन्नियन’चा हिंदी रिमेक असणार आहे. मूळ तमिळ भाषित असलेला हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. यात दक्षिणात्य अभिनेता विक्रमने प्रमुख भूमिका साकारली होती. आता याच्या हिंदी रिमेक मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रणवीरने सोशल मीडियाद्वारे याबदद्ल माहिती दिली आहे. ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीर सोबत दिग्दर्शक शंकर आणि प्रसिद्ध निर्माते जयंतीलाल गडा दिसत आहे. मला ही घोषणा करताना अभिमान वाटत आहे, की मी भारतीय सिनेमाच्या एका दूरदर्शी कलाकार शंकरसोबत काम करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते जयंतीलाल गडा करणार आहे. असे कॅप्शन या फोटोला रणवीर ने दिले आहे.

 अन्नियन हा चित्रपट अपरिचित या नावाने हिंदीत डब करण्यात आला होता. भारताच्या सर्वच प्रेक्षकांनी याला भरभरुन प्रतिसादही दिला होता. मात्र आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनत असून रणवीर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. रणवीर लवकरच माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनपटावर आधारित ८३ या चित्रपटात दिसणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. सोबतच रणवीरने रोहित शेट्टीच्या सर्कच या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे.


हे वाचा-  काही दिवसांपूर्वीच कोरोना लस घेतली असताणाही आशुतोष राणाला कोरोनाची लागण