दिपिकाच्या वस्तू का ढापतोस? स्लिंग बॅगवरून रणवीर सिंह ट्रोल

रणवीर नेहमीच त्याच्या लुक सोबत एक्सपीरिमेंट करत असतो.

ranveer singh troll on airport look users says why you steal deepika things
दिपिकाच्या वस्तू का ढापतोस? स्लिंग बॅगवरून रणवीर सिंह ट्रोल

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh)त्याच्या अभिनया व्यतीरीक्त त्याने केलेल्या अतरंगी स्टाईलमुळे जास्त लाइम लाइटमध्ये असतो. रणवीरने केलेल्या प्रत्येक लुकची चर्चा सोशल मीडियावर तसेच बी-टाउनमध्ये विशेष रंगताना दिसते. रणवीरला नुकतच एयरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे. यादरम्यान रणवीरने ऑरेंज कलरचा जॅकेट,ब्राउन बेलबॉटम पॅन्ट आणि बॅल्क कलरची स्लिंग बॅग असा लूक केला होता. रणवीरच्या या लूकवर नेटकऱ्यांनी एका क्षणाचाही वेळ न दवडता ट्रोल करण्यास सूरुवात केली. अनेकांना रणवीरचा हा लूक प्रचंड आवडला तर अनेक यूजर्सने रणवीरच्या फोटोवर कमेंट करत लिहले आहे की, “दिपिकाच्या वस्तू का ढापतोस?”, तर एकाने लिहले “जोकर दिसत आहेस.” रणवीरचा हा स्लिंग बॅगचा फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेक मीम मेकरने रणवीरच्या या स्टईलवर मीम व्हायरल करण्यास सुरूवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

रणवीर नेहमीच त्याच्या लुक सोबत एक्सपीरिमेंट करत असतो. अनेकदा त्याला या फनी लुकमुळे नेटकऱ्यांच्या टिकेला देखिल सामोरे जावे लागते. आताही रणवीरच्या या लुक्सवर सोशल मीडीयावर प्रंचड मीम्स व्हायरल होत आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी रणवीरच्या या भन्नाट लूकला पसंती दर्शवली आहे.

रणवीर सिंह स्लिंग बैग पर हुए ट्रोल

वर्क्रफंट बाबतीत सांगायचे झाल्यास लवकरच रणवीर सिंह. 83,सुर्यवंशी ,सर्कस, रॉकी और रानी की प्रेम कहानी,या सिनेमात झळकणार आहे.हे हि वाचा – ‘कुमकुम भाग्य’ फेम शिखा सिंग बोल्ड टॉपलेस फोटोमुळे होतेय ट्रोल