यापुढे फक्त कुटुंब प्रधान सिनेमे करणार- रणवीर सिंह

रणवीर आगामी काळात जयेशभाई जोरदार, अन्नियमचा रिमेक सर्कस आणि करण जौहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात दिसणार आहे.

ranveer singh completes first sindhi film dadho sutho directed by national award winner amit sharma
Ranveer Singh : रणवीर सिंहच्या पहिल्या सिंधी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; केव्हा होणार रिलीज?

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंहने (Ranveer Singh ) गेल्या काही वर्षात त्याच्या तगड्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 83 या सिनेमातून रणवीर पुन्हा एकदा एक उत्तम अभिनेता म्हणून पसंतीस पडला. 83 हा सिनेमा 2021मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. प्रेक्षकांनी सिनेमाला आणि रणवीरला प्रचंड प्रेम दिले. रणवीरच्या अभिनय कारकिर्दीतील 83 हा सिनेमाने रणवीरच्या करिअरला चार चाँद लावले. रणवीर आगामी काळात जयेशभाई जोरदार, अन्नियमचा रिमेक सर्कस आणि करण जौहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात दिसणार आहे. रणवीरने आजवर अनेक रोमँटीक, ऐतिहासिक, कॉमेडी सिनेमे केले आहेत. मात्र यापुढे रणवीर कौंटुबिक आणि मनोरंजनात्मक सिनेमे करणार असल्याचे म्हटले आहे.

रणवीरने सिंहने म्हटले आहे की, मी आता अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मला वाटत आहे की, यापुढे मी असे सिनेमे निवडेन की ज्यात मी मोठ्या पडद्यावर प्रत्येक वयातील प्रेक्षकांचे मनोरंजन करेन. कारण वेळेनुसार आणि वयानुसार प्रत्येक माणूस फॅमिली ओरिएंटेड होतो. मला ही माझ्या कुटुंबासोबत सिनेमा पहायला आवडते. मी माझ्या सासरच्या मंडळींसोबत माझ्या आई वडिलांसोबत, मुलांसोबत सिनेमा पाहतो.

रणवीर पुढे म्हणाला, मी माझी संपूर्ण शक्ती अशा सिनेमांवर खर्च करू इच्छितो की तो सिनेमा अनेक लोक एकत्र येऊन पाहू शकतात. एक कुटुंब एकत्र येऊन एखादी गोष्ट करत असेल तर त्याने त्यांच्यातील नाती आणखी घट्ट होतात. तसेच सिनेमाचे देखील आहे. मी माझ्या सर्व मित्रांसोबत 3 इडियट्स हा सिनेमा पाहिला होता. यावेळी आम्ही केलेली मज्जा आम्ही कधीच विसरू शकत नाही. एकत्र येऊन सिनेमा पाहिल्याने आमच्यातील नाते अधिक दृढ झाली आहेत मात्र त्याही पेक्षा मी फॅमिली ओरिएंटेड माणूस झालो आहे.


हेही वाचा – दीपिका पदुकोणच्या बहुप्रतिक्षित ‘Gehraiyaan’ सिनेमाचे टायटल साँग रिलीज