Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन रणवीर सिंह झळकणार हॉलिवूडमध्ये; विलियम मॉरिस एंडेव्हरसोबत केला करार

रणवीर सिंह झळकणार हॉलिवूडमध्ये; विलियम मॉरिस एंडेव्हरसोबत केला करार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. येत्या काळात रणवीर अभिनेत्री आलिया भट्टसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर आणि आलिया हे दोघेही मुख्य भूमिकेत असणार आहे. दरम्यान, अशातच रणवीर हॉलिवूडमध्ये देखील झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे.

रणवीरने केला विलियम मॉरिस एंडेव्हरसोबत करार

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंहने हॉलिवूड टॅलेंट एजन्सी विलियम मॉरिस एंडेव्हरसोबत करार केला आहे. रणवीरचा हा करार दर्शवतो की, त्याने हॉलिवूड चित्रपटात काम करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. विलियम मॉरिस एंडेव्हर अनेक मोठ्या कलाकारांचे काम हाताळतात. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 2021 मध्ये हॉलिवूड टॅलेंट एजन्सी विल्यम मॉरिस एंडेव्हरशी करारा केला होता. आलिया भट्ट हॉलिवूडच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटमध्ये दिसणार आहे.

रणवीर सिंहचा आगामी चित्रपट

- Advertisement -

रणवीर सिंह आगामी काळात ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी चित्रपटागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह शिवाय आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवाय या चित्रपटाआधी रणवीर ‘सर्कस’ चित्रपटामध्ये दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

 


- Advertisement -

हेही वाचा :

चित्रपटाच्या यशासाठी सारा अली खान पोहोचली महाकाल मंदिरात

- Advertisment -