रणवीर सिंह साकारणार ‘शक्तिमान’ची भूमिका

90 च्या दशकात टेलिव्हिजनवर 'शक्तिमान' हा कार्यक्रम घेऊन येणारे मुकेश खन्ना यांनी या वर्षी शक्तिमान चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती

आत्तापर्यंत आपण अभिनेता रणवीर सिंहला ‘गली बॉय’ पासून ते कपिल देव यांच्या ’83’ चित्रपटापर्यंत अश्या अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना पाहिलेलं आहे. रणवीर सिंहच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. येत्या आगामी काळात रणवीर सिंह आणखी एक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणवीर सिंह या चित्रपटामध्ये भारताचा पहिला सुपरहिरो शक्तिमानची भूमिका साकारताना दिसणार आहे. 90 च्या दशकात टेलिव्हिजनवर ‘शक्तिमान’ हा कार्यक्रम घेऊन येणारे मुकेश खन्ना यांनी या वर्षी शक्तिमान चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. मात्र आता सूत्रांच्या मते शक्तिमानची भूमिका अभिनेता रणवीर सिंह साकारणार आहे.

रणवीर सिंह सुद्धा चित्रपटासाठी उत्सुक
सूत्रांच्या माहितीनुसार रणवीर सिंहला या चित्रपटासाठी ऑफर देण्यात आली असून त्याने चित्रपटासाठी सहमती दर्शवलेली आहे. तसेच तो ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक देखील आहे. निर्मात्यांना सुद्धा या चित्रपटाला रणवीर सिंह चार चाँद लावेल याची खात्री आहे.

फेब्रुवारीमध्ये करण्यात आली होती ‘शक्तिमान’ चित्रपटाची घोषणा
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सोनी पिक्चर्सने एका टीजर व्हिडीओ सोबत शक्तिमानची घोषणा केली होती. टेलिव्हिजन वर शक्तिमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांची कंपनी भीष्म इंटरनॅशनल सुद्धा या प्रोजेक्टवर काम करत आहे. मात्र, ज्यावेळी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती तेव्हा हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होईल असं सांगण्यात आलं होतं. तसेच या टीझरमध्ये शक्तिमानच्या नव्या पोशाखाची झलक दाखवण्यात आली होती. ज्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

या चित्रपटांमध्ये दिसणार रणवीर
रणवीर येत्या काळात रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या रणवीर आलिया सोबत करण जौहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करत आहे. तसेच त्यानंतर तो ‘सिंबा 2’ चित्रपटात सुद्धा दिसून येईल.


हेही वाचा :‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलिया भट्टने हनीमूनबद्दल केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल