‘दृश्यम 2’ आणि ‘अवतार 2’ मुळे रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ ला फटका

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांचा ‘सर्कस’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन होणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने फारशी कमाई केलेली नाही. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी केवळ 6 कोटींची कमाई केली होती. यामागचं कारण म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले ‘दृश्यम 2’ आणि ‘अवतार 2’ हे चित्रपट आहेत. या चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल अधिक पाहायला मिळत आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहेत. त्यामुळे ‘सर्कस’ चित्रपटाच्या कमाईत वाढ दिसून येत नाही.

‘सर्कस’ची बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाई
रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी 6.50 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी 8.2 कोटी आणि चौथ्या दिवशी 2.25 कोटी कमावले शिवाय आत्तापर्यंत एकूण या चित्रपटाने 23 कोटींचा आकडा पार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण 150 कोटींचा खर्च केला आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘सर्कस’मध्ये दिसणार जुळ्या भावांची गोष्ट
रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस चित्रपट विल्यम शेक्सपिअरचे नाटक द कॉमेडी ऑफ एरर्स वर आधारित आहे. यामध्ये रणवीर सिंह डबल रोलमध्ये दिसणार आहे. रणवीर व्यतिरिक्त वरुण शर्मा देखील या चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

‘सर्कस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती रोहित शेट्टीने केली असून यामध्ये रणवीर सिंह, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, जॉनी लीवर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील.23 डिसेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

 


हेही वाचा :

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ ठरला भारतात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हॉलिवूड चित्रपट