83 Teaser out : रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित ‘८३’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयावर आधारित ’८३’ हा चित्रपट दिग्दर्शक कबीर खानने दिग्दर्शित केला आहे.

Trailer out of Ranveer Singh's much awaited '83'; Will come to visit the audience on 24th December
83 Trailer Out : रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित '८३' चा ट्रेलर आउट ; २४ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा बहुप्रतिक्षित ‘८३’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.या शानदार टीझरने पुन्हा एकदा ऐतिहासिक क्रिकेट विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. कोरोनाच्या सावटामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन बरेच दिवस रखडले होते. अशा परिस्थितीत टीझर रिलीज झाल्यानंतर चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा ‘८३’ हा चित्रपट यावर्षी २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या कथेवर आधारित हा चित्रपट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

टीझरची सुरुवात ग्रेस्केल व्हिज्युअलने होते आणि हे दृश्य २५ जून १९८३ च्या दिवशी घडलेला लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम गौरवशाली इतिहास दाखवण्यात आला आहे. व्हिडिओचा शेवट कपिल देव यांच्या भुमिकेत असणाऱ्या रणवीर सिंह बॉल पकडतानाचे दृश्य दाखविण्यात आले आहे.

कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट एप्रिल २०२०मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख टळली. त्यानंतर अनेक वेळा ’८३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसंदर्भात तर्क-वितर्क लावले गेले. यावर्षी जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयावर आधारित ’८३’ हा चित्रपट दिग्दर्शक कबीर खानने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तसेच भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर साकारणार आहे. रणवीरच्या या टीमने चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.


हे ही वाचा – Swara Bahskar: अभिनेत्री स्वरा भास्कर होणार आई, म्हणाली मुलासाठी अजून नाही थांबू शकत नाही