रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ

एका प्रसिद्ध मॅगजीनसाठी रणवीर सिंहने हे फोटोशूट केलं असून काही फोटोंमध्ये रणवीर पूर्णपणे कपड्यांशिवाय असल्याचं दिसत आहे. या फोटोंमध्ये रणवीरने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या दमदार अभिनयासोबतचं त्याच्या अतरंगी फॅशनमुळे देखील ओळखला जातो. सोशल मीडियावर अनेक युजर्स त्याला अनेकदा त्याच्या फॅशनमुळे ट्रोल करत असतात. तर काही युजर्स त्याच्या फॅशनचं कौतुक करत असतात. दरम्यान, आता या फॅशन किंग रणवीर सिंहने आणखी एक अतरंगी फोटोशूट केलं आहे. मात्र, यावेळी त्याने कोणतेही चित्र-विचित्र कपडे घातले नसून त्याने चक्क या वेळी न्यूड फोटोशूट केलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच युजर्सच्या भुवया उंचावल्या आहेत.

रणवीर सिंहचं मॅगजीनसाठी न्यूड फोटोशूट

एका प्रसिद्ध मॅगजीनसाठी रणवीर सिंहने हे फोटोशूट केलं असून काही फोटोंमध्ये रणवीर पूर्णपणे कपड्यांशिवाय असल्याचं दिसत आहे. या फोटोंमध्ये रणवीरने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहे. शिवाय तो कॉन्फिडेंट असल्याचं देखील दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Paper Magazine (@papermagazine)

रणवीर सिंहचं हे फोटोशूट पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. रणवीरचे चाहते त्याचं कौतुक देखील करताना दिसत आहेत. तर काही युजर्स हे फोटो फेक असल्याचं देखील बोलत आहेत.खरंतर, याआधी रणवीर सिंहचा हा अंदाज कोणीही पाहिला नव्हता. त्यामुळेच काहींना हे फोटो फेक वाटत आहेत.

विजय देवरकोंडाने सुद्धा केलं होतं न्यूड फोटोशूट

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडाने त्याच्या लायगर चित्रपटासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. जेव्हा हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. तेव्हा विजयचे चाहते आश्चर्यचकित झाला होता. विजय देवरकोंडा नंतर आता रणवीर सिंहने त्याच अंदाजात न्यूड फोटोशूट केलेलं आहे.

या चित्रपटात झळकणार रणवीर सिंह
रणवीर येत्या काळात रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या रणवीर आलिया सोबत करण जौहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करत आहे. तसेच त्यानंतर तो ‘सिंबा 2’ चित्रपटात सुद्धा दिसून येईल.


हेही वाचा :“काय झाडी, काय हॉटेल, ओक्के मधी समद…”, ‘दे धक्का 2’ मध्ये शिवाजी साटम यांचा भन्नाट डायलॉग