फिल्मफेअर अचिव्हर्स अवॉर्डमध्ये गोविंदाचा डान्स पाहून रणवीरही थिरकला

नुकतंच दुबईमध्ये फिल्मफेअर अचिव्हर्स नाईटचं आयोजन करण्यात आलं होतं. जिथे चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पोहोचले होते. या कलाकारांमध्ये बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंह देखील उपस्थित होता. यावेळी या सोहळ्यात रणवीरने चांगलीच धम्माल उडवली. सध्या या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहेत. ज्यामध्ये 90 च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा त्यांच्या हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत आणि त्यांच्या समोर स्टेज खाली रणवीर देखील डान्स करत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून रणवीर आणि गोविंदाचे चाहते देखील खूश झाले आहेत.

गोविंदाच्या डान्सवर थिरकला रणवीर सिंह

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

या सोहळ्यातील सर्व व्हिडीओ आता समोर आले आहेत. या व्हिडीमध्ये स्टेजवर गोविंदा त्याच्या चित्रपटातील जुन्या गाण्यांवर डान्स करत आहे. तर स्टेसखाली रणवीर सिंह, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर देखील थिरकताना दिसत आहेत. दरम्यान, गोविंदाचा डान्स संपताच रणवीर सिंह स्टेजवर जाऊन त्याला दंडवत घालताना देखील दिसत आहे.

रणवीर सिंहला देखील मिळाला फिल्मफेअर अचिव्हर्स अवॉर्ड

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

फिल्मफेअर अचिव्हर्स अवॉर्डमधील रणवीर सिंहचा उत्साह पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. या फिल्मफेअर अचिव्हर्स अवॉर्ड सोहळ्यात रणवीरला देखील अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी रणवीर खूप भाऊक झाला.

या चित्रपटांमध्ये झळकणार रणवीर
रणवीर सिंहचा मागील काही दिवसांपूर्वी ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपट रिलीज झाला होता. याशिवाय रणवीर येत्या काळात करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे.

 


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने अवघ्या दोन दिवसांत कमावला करोडोंचा गल्ला