घरमनोरंजन'या' चित्रपटात रणवीर नसता तरीही मी भूमिका केली असती; दीपिका पदुकोणचे परखड...

‘या’ चित्रपटात रणवीर नसता तरीही मी भूमिका केली असती; दीपिका पदुकोणचे परखड मत

Subscribe

अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग-दीपिका पदुकोण ही रिअल लाईफ जोडी लग्नानंतर पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र झळकणार आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी दीपिकाने होकार दर्शवला आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीर सिंग-दीपिका पदुकोण ही रिअल लाईफ जोडी एकत्र काम करणार आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने या चित्रपटातील भूमिकेविषयी परखड मत व्यक्त केले आहे.

खासगी आयुष्याचा कामावर परिणाम होवू देणार नाही

यावेळी लग्नानंतर रणवीरसोबत स्क्रीन शेअर करण्याविषयी दीपिकाला विचारण्यात आले. तेव्हा खासगी आयुष्याचा परिणाम कामावर होवू न देण्याचे तिने स्पष्ट केले. तसेच या चित्रपटात रणवीरने जरी कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारली नसती तरीही मी या चित्रपटात भूमिका साकारली असती, असे परखड मत दीपिकाने मांडले. कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेसुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -