रणवीरला सहन होईना दुरावा, पोहोचला दीपिकाला भेटायला

रणवीर आणि दीपिका हे हिंदी सिनेसृष्टीमधल एक हसरे खेळते कपल आहे. त्यांचा हाच स्वभाव आणि त्यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना सुद्धा आवडते. शुक्रवारी सकाळी रणवीर सिंग मुंबई विमानतळावर दिसला.

बॉलिवूडमधील सगळ्यात मस्त आणि सतत आनंदित असलेले कपल म्हणून ‘दिपवीर’ ओळखले जाते. दिपवीर म्हणजेच दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग. सध्या ७५ वा कान्स चित्रपट महात्सव खूप उत्साहात सुरु आहे. त्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन सध्या फ्रान्समध्ये आहे. तिला भेटल्यासाठी तिचा पती अभिनेता रणवीर सिंग हा थेट कान्स चित्रपट महोत्सवात पोहोचला आहे.

दीपिकाला रणविर खूप मिस करतोय. त्याला तिच्या सोबत छान वेळ घालवायचा आहे. म्हणून रणवीर सिंग दीपिकाला भेटण्यासाठी थेट कान्स चित्रपट महोत्सवात पोहोचला. रणवीर आणि दीपिका हे हिंदी सिनेसृष्टीमधल एक हसरे खेळते कपल आहे. त्यांचा हाच स्वभाव आणि त्यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना सुद्धा आवडते. शुक्रवारी सकाळी रणवीर सिंग मुंबई विमानतळावर दिसला. कान्स चित्रपट महोत्सवाला जाण्यासाठी रवाना होत होता. नेहमी प्रमाणे त्यावेळीसुद्धा रणवीरने त्यांच्या हटके स्टाईलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रणवीरचा फॅशन सेन्स हा नेहमी सर्वांपेक्षा खूप वेगळा असतो आणि त्यासाठी तो नेहमी चर्चेतही असतो.

चित्रपटांच्या शूटिंगचे व्यस्त वेळापत्रक आणि चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये गेले काही दिवस रणबीर खूप व्यस्त होता आणि या सगळ्यातून त्याला ब्रेक हवा होत.  त्याचबरोर त्याला त्याचा हा स्पेशल टाईम दीपिकासोबत एन्जॉय करायचा होता म्हणून  कान्स चित्रपट महोत्सवात दीपिकाला भेटायला गेला असे रणवीरने सांगितलं. रणवीरसाठी हा ब्रेक म्हणजे एक छोटीशी ट्रिप असल्याचे दिसते. कान्स चित्रपट महोत्सवातले रणवीर आणि दीपिकाचे फोटोस त्यांच्या चाहत्यांना सुद्धा आवडत आहेत.