T-Seriesचे मालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल !

काम देण्याचे आमिष दाखवून एका 30 वर्षीय मुलीवर भुषण कुमार यांनी अत्याचार केल्याचा आरोपपीडित तरुणीने लावला आहे.

Rape case filed against T-Series owner Bhushan Kumar
T-Seriesचे मालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल !

बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. टी-सीरिज (T-Series) कंपनीचे सर्वेसर्वा भूषण कुमार(Bhushan Kumar) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. टी-मालिका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका 30 वर्षीय मुलीवर भुषण कुमार यांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने लावला आहे. याप्रकरणी मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत असल्याचे कळतेय.
माहितीनूसार, मुंबईतील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडली असून 2017 ते 2020 पर्यंत भूषण कुमार बलात्कार करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच पीडित तरुणीला तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याचे तिने सांगितले आहे. मात्र या संपुर्ण घटनेबाबत भूषण कुमार किंवा त्यांच्या टिमने अद्याप कोणत्याही प्रकारचे वक्तव्य तसेच स्पष्टीकरण दिलं नाहिये.(Rape case filed against T-Series owner Bhushan Kumar )

काही वर्षापासून सूरु असलेल्या मीटू चळवळीच्या माध्यमातून यापुर्वी सुद्धा भूषण कुमार यांच्यावर मॉडेल मरीना कुंवर हिने शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता . पण त्यावेळेस भूषण कुमार यांनी स्पष्टीकरण देत स्वतःवरील आरोप फेटाळून लावत वक्तव्य केलं होतं की, केवळ प्रसिद्धीसाठीच त्यांची बदनामी केली जात आहे. मात्र सध्या घडलेल्या प्रकरणाबाबत भुषण कुमार यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नसून अद्याप  मौन धारण केले आहे.हे हि वाचा – रामायणातील कथेवर आधारित डान्स परफॉर्मन्स पाहून शिल्पा शेट्टी झाली चकीत