घरमनोरंजन'बचपन का प्यार' व्हायरल सॉंगचे येणार रॅपर बादशाह - सहदेव व्हर्जन

‘बचपन का प्यार’ व्हायरल सॉंगचे येणार रॅपर बादशाह – सहदेव व्हर्जन

Subscribe

छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या सहदेवने 2019 साली त्याच्या शाळेत बचपन का प्यार हे गाणं गायलं होतं.

आजची तरुणाई मोबाईलवर जर सर्वात जास्त वेळ सोशल मीडियावर घालवते. सोशल मीडियाद्वारे लोकांना मनोरंजनाची मेजवानीच उपलब्ध होऊ लागली असे म्हणायला हरकत नाही.फेसबूक,ट्विटर,टेलिग्राम सारख्या विविध ॲप्लिकेशनचा वापर आता वाढू लागला आहे. दरदिवशी काही ना काही इंटरनेटवर व्हायरल होत असते. यामध्ये इंस्टाग्राम रिल्ससुद्धा महत्वपुर्ण सहभाग आहे. सोशल मीडियावर सध्या टिक-टॉक बॅन झाल्यानंतर इंस्टाग्राम रिल्स हा एक नविन प्रकार नेटकऱ्यांच्या भेटीस आला. काही सेंदाच्या व्हिडिओद्वारे अनेक लोकं सोशल मीडियावर ट्रेंन्ड होऊ लागली . सध्या इंटरनेटवर ‘जाने मेरी जानेमन,बसपन (बचपन) का प्यार मेरा भूल नहीं जाना’ हा रिल्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी यावर आपल्या वेगवेगळ्या अंदाजात इंस्टा रिल्स अपलोड केली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे गाण सहदेव दिर्दो या मुलाचा आहे. या गाण्यामुळे सहदेव चांगलाच चर्चेत आलाय. स्टार आणि राजकरणी मंडळी आता सहदेवला भेटण्यासाठी येत आहेत. नुकतच प्रसिद्ध रॅपर बादशाहने देखील सहदेवची भेट घेतली आहे. आणि सहदेवसोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यासोबतच बादशाहने बचपन का प्यार हे गाणं तयार करणार असल्याची घोषणा केली आहे.

फोटो पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by BADSHAH (@badboyshah)

- Advertisement -

बचपन का प्यार हे गाणं गाऊन सहदेव रातोरात सोशल मीडियावर स्टार झाला आहे. 10 वर्षाच्या सहदेव सोबत बादशाहने एका स्टायलिश अंदाजात फोटो क्लिक केला आहे.तसेच बादशाहने कॅप्शन देत लिहलं आहे की, ‘लवकरच येत आहे बचपन का प्यार’
छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या सहदेवने 2019 साली त्याच्या शाळेत बचपन का प्यार हे गाणं गायलं होतं. तसेच त्याच्या शिक्षकांने हे गाणं रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर पोस्ट केलं. आता सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटींना देखील या गाण्याची भूरळ पडली आहे. अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यासोबत आपला व्हिडिओ पोस्ट केला आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीने पहिल्यांदा शेअर केला तिचा सुंदर हसरा फोटो

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -