लोकप्रिय रॅपर एमीवे बंटायने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मोठा आनंदाचा धक्का दिला आहे. रॅपर एमीवे आणि गायिका स्वालीना यांनी लग्न केले असून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. दोघांनीही आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर हे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते चकितसुद्धा झाले आणि आनंदीसुद्धा! एमीवे बंटाय आणि स्वालीना यांनी २०२३ मध्ये कुडी या हिट ट्रॅकसाठी एकत्र काम केले होते. यानंतर आता दोघांनीही एकमेकांना साता जन्माचा जोडीदार म्हणून निवडले आहे. (Rapper Emiway Bantai tie marriage knot with model Swaalina)
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
एमीवे आणि स्वालिना दोघांनीही इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघांचाही लूक फारच रिच फील देतोय. आपल्या आयुष्यातील खास क्षणासाठी त्यांनी प्लम आउटफिटची निवड केली होती. स्वालिनाने सुंदर प्लम ब्लाउजसोबत डस्टी रोज दुल्हन लेहंगा परिधान केला होता. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट दिसून येत आहे. अखेर बंटायची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ऑफिशियल केमिस्ट्रीमध्ये परिवर्तित झाली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना त्यांनी ‘अल्हम्दुलिल्लाह’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दोघांचाही ट्रॅडिशनल अंदाज चाहत्यांना भावला आहे. प्रत्येक फोटोत त्यांनी एकापेक्षा एक सुंदर पोज देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चेहऱ्यावर स्माईल, वेडिंग आऊटफिट आणि किलर पोजमूळे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करतात. दरम्यान, या फोटोवर नेटकऱ्यांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे. काहींनी एमीवे आणि स्वालीना यांच्यावर शुभेच्छांची उधळण केली आहे. तर काहींनी हे फोटोशूट आगामी म्युझिक व्हिडिओशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.
खरं लग्न की प्रमोशनल स्टंट?
सोशल मीडियावर एमीवे बंटाय आणि स्वालीना यांचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. मिनिटाला या फोटोंवर कमेंट पडताना दिसत आहेत. मात्र या कमेंट्समध्ये नेटकरी संभ्रमात पडल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी एमीवेला तुझं खरंच लग्न झालंय का? असा सवाल केला आहे. तर काहींनी या फोटोंवर कमेंट करताना हा प्रमोशनल स्टंट असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकरी नक्की काय खरं आहे? अशी विचारणा करत आहेत.
एमीवे आणि स्वालिनाविषयी..
एमीवे बंटाय हा प्रसिद्ध रॅपर असून त्याचे मूळ नाव बिलाल शेख असे आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध रॅपर्सच्या यादीत एमीवे बंटायचे नाव घेतले जाते. त्याचे ‘मचाएंगे’, ‘फिर से मचाएंगे’, ‘खतम हुए वांदे’ आणि ‘बैड मुंडा’ सारखे रॅप ट्रॅक प्रचंड लोकप्रिय आहेत. तर स्वालिनाचे मूळ नाव हलीना आहे. ती फिनलैंडची आहे. ती एक मॉडल आहे आणि तिने काही पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. शिवाय ती गायिकादेखील आहे.
हेही पहा –
Abhishek Rahalkar: मन धागा धागा जोडते नवा फेम अभिनेत्याचा दणक्यात साखरपुडा, फोटो व्हायरल