अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या गाण्याला आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळला होता. दरम्यान, आता पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘गुडबाय’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. पहिल्या दिवशी ‘गुडबाय’ने केवळ 1.2 कोटींची कमाई केली आहे.
‘गुडबाय’ चित्रपटाला चांगले रिव्यू मिळूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी फारसे उत्सुक असल्याचं दिसून येत नाही. रश्मिकाने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील खूप मेहनत घेतली होती. मात्र चित्रपटाच्या कमाई वरून प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळाला असल्याचं दिसून येत आहे.
2022 मधील सर्वात कमी कमाई करणारे चित्रपट
- बधाई दो – 19 कोटी
- झुंड – 23 कोटी
- हीरोपंती – 21.5 कोटी
- रनवे 34 – 35 कोटी
- जर्नी – 20.54 कोटी
- धाकड – 4 कोटी
- अनेक – 9 कोटी
हेही वाचा :