घरमनोरंजनRashmika Mandana Birthday : ...आणि 'नॅशनल क्रश' श्रीवल्लीचा साखरपुडा तुटला

Rashmika Mandana Birthday : …आणि ‘नॅशनल क्रश’ श्रीवल्लीचा साखरपुडा तुटला

Subscribe

भारताची नॅशनल क्रश म्हटली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे रश्मिका आणि तिच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सोशल मीडियावर चाहते रश्मिकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत, तसेच सेलिब्रिटीही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या खास दिवशी आपण रश्मिकाच्या आयुष्यातील न माहित असलेल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

आपल्या क्यूट स्माईलने सर्वांची मने जिंकणाऱ्या रश्मिका मंदान्ना हीचा जन्म कर्नाटकातील विराजपेठ येथे झाला. त्याच्या आई-वडिलांचे नाव सुमन आणि मदन मंदान्ना असे आहे. रश्मिकाने एमएस रामय्या कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समधून बॅचलर पूर्ण केले. तिने सायकोलॉजी, इंग्रजी लिटरेचर आणि जर्नलिस्ट या विषयात बॅचलर केले आहे. पण तिने आपल्या करिअरसाठी अभिनयाची निवड केली.

     

- Advertisement -

रश्मिका मंदान्ना ही साऊथ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रश्मिकाने 2016 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. किरिक पार्टी या कन्नड चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केले. हा त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. यावेळी रश्मिकाच्या अभिनयाचे कौतुक तर झाले तसेच तिला बेस्ट डेब्यूचा पुरस्कारही मिळाला.

यानंतर रश्मिका मंदान्ना चमक आणि अंजनी पुत्र या दोन कन्नड चित्रपटांमध्ये दिसली 2018 मध्ये रश्मिकाने पहिल्यांदा विजय देवरकोंडासोबत गीता गोविंदम या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे कौतुक झाले. त्यानंतर महेश बाबूसोबतचा रश्मिकाचा सरिलेरू नीकेव्वरू हा चित्रपट प्रदर्शित झाला. जो नंतर सर्वाधिक कमाई करणारा तेलुगु चित्रपट ठरला.

रश्मिका मंदान्नाची सुंदरता आणि तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती भारताची नॅशनल क्रश बनली. पुष्पा पार्ट 1 या चित्रपटाने रश्मिकाच्या कारकिर्दीला पंख दिले आणि तिने पुन्हा एकदा देशावर वर्चस्व गाजवले. आता ती श्रीवल्ली या नावाने ओळखली जाऊ लागली आहे.

रश्मिकाची प्रेमकहाणी फार काळ टिकली नाही

26 वर्षीय रश्मिका मंदान्नाने तिच्या करिअरमध्ये खूप यश पाहिले आहे, पण तिचे वैयक्तिक जीवन खूप अडचणीतून गेले आहे. किरिक पार्टी या पहिल्या चित्रपटादरम्यान रश्मिकाची अभिनेता रक्षित शेट्टीची ओळख झाली. यावेळी दोघे प्रेमात पडले आणि 2017 मध्ये दोघांनी लग्न केले. मात्र, ही प्रेमकहाणी फार काळ टिकली नाही आणि 2018 मध्ये दोघे वेगळे झाले.

पण असं म्हणतात की तुमचं प्रेम तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा तुम्हाला तुमची योग्य व्यक्ती तुमच्यासोबत मिळते. आता रश्मिका मंदान्नाच्या आयुष्यात पुन्हा कोणीतरी खास आले आहे. ही खास व्यक्ती म्हणजे अभिनेता विजय देवरकोंडा. विजय आणि रश्मिका अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. दोघेही रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, रश्मिका मंदान्नाचा येणारा काळही खूप चांगला जाणार आहे. तिने अनेक हिंदी चित्रपट साइन केले आहेत. रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रा ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. यासोबतच ती ‘पुष्पा पार्ट २’ मध्येही धमाल करणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -