‘सीता रमण’ चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत

रश्मिकाने चित्रपटाचं पोस्टर शेअर करताच चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. कारण या चित्रपटाचं नाव 'सीता रमण' असं आहे आणि त्यात रश्मिकाने यात लाल रंगाचा हिजाब परिधान केला आहे

सध्या चित्रपटसृष्टीत अनेक बॉलिवूड कलाकार टॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसून येत आहेत, तर टॉलिवूडचे अनेक कलाकार बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकत आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे तिला टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्ये देखील मोठ्ठी क्रेज मिळाली. त्यामुळे येत्या काळात ती सुद्धा इतर कलाकारांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकतंच तिच्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिवील करण्यात आले आहे.

या चित्रपटात झळकणार रश्मिका

‘पुष्पा’ चित्रपटापासून रश्मिका मंदाना वारंवार चर्चेत असते. येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून ‘सीता रमण’ या चित्रपटात ती झळकणार आहे. काल ईदच्या निमित्त साधत रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘सीता रमण’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

चाहते रश्मिकाला बॉलिवूड चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक
रश्मिकाने चित्रपटाचं पोस्टर शेअर करताच चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. कारण या चित्रपटाचं नाव ‘सीता रमण’ असं आहे आणि त्यात रश्मिकाने यात लाल रंगाचा हिजाब परिधान केला आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत टॉलिवूड स्टार दुलकर सलमान आणि अभिनेत्री मृणाल ठाकुर सुद्धा दिसून येतील. दुलकर सलमान या चित्रपटात एका सैनिकाच्या भूमिकेत दिसून येतील. तसेच मृणाल ठाकुर त्यांच्या प्रियसीच्या भूमिकेत दिसेल.

या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकणार रश्मिका
खरंतर रश्मिका ‘मिशन मजनू’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिसून येईल. त्याशिवाय रश्मिका टायगर श्रॉफसोबत देखील एका चित्रपटात दिसणार आहे. तसेच रश्मिका करण जौहरच्या ‘कॉफी विद करण 7’ मध्ये सुद्धा दिसून येईल.


हेही वाचा :Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा साडीमधील मनमोहक लूक ; पाहा फोटो