घरमनोरंजनरश्मिका मंदानाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिसणार या चित्रपटात

रश्मिका मंदानाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिसणार या चित्रपटात

Subscribe

दक्षिणात्या अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघे नव्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.

गीता गोविंदम फेम दक्षिणात्या अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नॅशनल क्रश असलेल्या रश्मिका ने तिच्या दिलखुलास अदांनी आणि अभिनयाने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. आता रश्मिका सिद्धार्थसोबत तिच्या आगामी बॉलिवूड डेब्यू ‘मिशन मजनू’ मध्ये दिसणार आहे. शांतनू बागची दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या शूंटींगसाठी रश्मिका आणि सिद्धार्थ लखनऊला रवाना झाले आहेत. शूटींगच्या ठिकाणाचे काही सुंदर फोटोज रश्मिकाने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 तेलुगु आणि तमिळ चित्रपटसृष्टीत डियर कॉमरेड, सरीलीरु निकेवारु आदी चित्रपटांतून लाखोंची मने जिंकणारी रश्मिका बॉलिवूड मध्येही आपली अदाकारी दाखवायला तयार झालेली आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाच्या माध्यमातून रश्मिका बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा रॉ एजेंटची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात शारिब हाशमी आमि कुमुद मिश्रा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. रश्मिकाने चित्रपटाच्या शुटींगदरम्यान काही पोस्टही शेअर केल्या आहेत. रश्मिकाने तिच्या दक्षिणात्या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलच पण आता तिच्या या बॉलिवूड पदार्पणासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असणार आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

हे वाचा –तापसीच्या ट्विटवर कंगनाने ‘हे’ रिट्विट करत साधला निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -