घरमनोरंजन'आशिकी 3' मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार रश्मिका मंदाना?

‘आशिकी 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार रश्मिका मंदाना?

Subscribe

1990 साली प्रदर्शित झालेला आशिका आणि 2013 साली प्रदर्सित झालेल्या 'आशिकी 2' या चित्रपटांनंतर येत्या काळात ‘आशिकी 3’ सारखी भावनिक प्रेम कथा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ चित्रपटाची जेव्हा पासून घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. कार्तिक आर्यन सोबत कोणती अभिनेत्री चित्रपटात मुख्य भूमिका साकारेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यन ‘आशिकी 3’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. 1990 साली प्रदर्शित झालेला आशिका आणि 2013 साली प्रदर्सित झालेल्या ‘आशिकी 2’ या चित्रपटांनंतर येत्या काळात ‘आशिकी 3’ सारखी भावनिक प्रेम कथा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापूर्वी ‘आशिकी’ आणि ‘आशिकी 2’ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या दोन्ही चित्रपटातील प्रेम कथा आणि गाणी आजही अजरामर आहेत.

‘आशिकी 3’ मध्ये ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका
मिळालेल्या माहिती नुसार, दिग्दर्शन अनुराग बसुच्या या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबतच चित्रपटामध्ये साउथ चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील असणार आहे. निर्मात्यांनी मुख्य भूमिकेसाठी रश्मिका मंदानाचं नाव फायनल केलं आहे. दरम्यान, अजून याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. खरंतर निर्माते ‘आशिकी 3’ मध्ये नवी जोडी घेऊ इच्छितात. त्यामुळे ‘आशिकी 3’ साठी कार्तिक आणि रश्मिकाची निवड करण्यात आली आहे. मात्र, या चित्रपटाची घोषणा करण्यापूर्वी कार्तिक आर्यनसोबत दीपिका पादुकोण, कृति सेनन आणि श्रद्धा कपूरच्या नावाची सर्वत्र चर्चा चालू होती.

- Advertisement -

या चित्रपटात दिसणार कार्तिक
कार्तिक आर्यन अभिनेत्री कृति सेनन सोबत ‘शहजादा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे, 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक अभिनेत्रीा कियारा अडवाणीसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटामध्ये दिसून येईल.

 

- Advertisement -

हेही वाचा :

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित; बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -