अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा आगामी मिशन मजनू या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. रॉनी स्क्रूवाला आरएसवी आणि गिल्टी बाय असोसिएशनने सिनेमाची निर्मिती केली आहे. रश्मिका मंदाना या सिनेमानिमित्त पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. १० जून २०२२ ला मिशन मजनू हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मिशन मजनू सिनेमात सिद्धार्थ रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहेत. सिद्धार्थचा या आधी शेरशाह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तर रश्मिकाने पुष्पा या ब्लॉकबस्टर सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता दोघेही एकत्र येऊन बॉलिवूडमध्ये धुमशान घालणार आहेत.
सिनेमाची कथा १९७०च्या दशकातील असून स्थापित जासूसी थ्रीलर पाहायला मिळणार आहे. पाकिस्तान विरोधात केलेल्या सर्वांत मोठ्या साहसी मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. सिद्धार्थ सिनेमात एका रॉ एजेंटची भूमिका साकारणार आहे जो पाकिस्तानमधील एका गुप्त ऑपरेशनचे नेतृत्व करत असतो. तर रश्मिकाच्या भूमिकेविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सिनेमात सिद्धार्थ, रश्मिका यांच्यासह शारिब हाशमी आणि कुमुद मिश्रा देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. परवेज शएख, असीम अरोरा आणि सुमित बजेथा यांनी सिनेमाचे लेखन केलेय तर शांतनु बागची यांचे दिग्दर्शन सिनेमात पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – विद्या बालन अन् शेफाली शाह स्टारर ‘Jalsa’ चा ट्रेलर आऊट