मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदानाने दक्षिणेपाठोपाठ आता बॉलिवूडमध्येही आपली छाप निर्माण केली आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातून रातोरात पॅन इंडियाची स्टार बनलेल्या रश्मिकाला ‘ॲनिमल’ने हिंदी पट्ट्यातही हिट केले. लोकप्रिय होत चाललेली ही अभिनेत्री नुकतीच एका डीपफेक व्हिडीओची शिकार झाली होती. मात्र ती शांत बसली नाही, त्याविरोधात तिने आवाज उठवला. रश्मिकाच्या या भूमिकेची अनेकांनी कौतुक केले. तर, यावर इतकी रिअॅक्ट होण्याची इतकी आवश्यकता नव्हती, असे काहींना वाटले. मात्र, याबद्दल खुद्द रश्मिकानेच खुलासा केला आहे.
हेही वाचा – War 2 Shooting: ‘फायटर’नंतर हृतिक ज्युनियर NTRसोबत ‘WAR’च्या तयारीत; ‘या’ दिवशी शूटिंग सुरू
रश्मिका मंदानाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत डीपफेक्सच्या मुद्द्यावर तिने अशी भूमिका का घेतली, हे स्पष्ट केले. इतरांना जागरूक करण्याच्या दृष्टीने असे करणे आवश्यक होते, असे तिने सांगितले. मी याविरोधात बोललो तर काही लोक म्हणतील की तू तर, इंडस्ट्रीचा एक भाग आहेस… काही म्हणतील की, अशा गोष्टी घडतच असतात, मग यावर प्रतिक्रिया कशाला? असे काही ऐकावेल लागेल, याची मला पूर्ण कल्पना होती, असेह ती म्हणाली.
#Animal star #RashmikaMandanna shares why she took a stand on her #deepfakevideo; says ‘That awareness was important’https://t.co/zhnnKoHIcH
— Bollywood Life (@bollywood_life) February 1, 2024
मी कॉलेजमध्ये असती आणि तिच्यासोबत असे काही घडले असते तर कोणीही तिच्या समर्थनास पुढे आले नसते, कारण आपला समाजच तसा आहे. डीपफेकच्या मुद्द्यावर बोलणे मला योग्य वाटले; जेणेकरुन लोकांना, विशेषत: तरुण मुलींना, सोशल मीडियावर डीपफेक नावाचा प्रकार अस्तित्वात आहे, याची जाणीव होऊ शकेल. एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यावर त्याचा किती परिणाम होऊ शकतो, हे सुद्धा समजून घेता येऊ शकतो.
हेही वाचा – Munawar Faruqui : ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्यावर पोलिसांची कारवाई, काय आहे प्रकरण?
रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर तिचा मॉर्फ केलेला हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला या वर्षी जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्या सोशल मीडिया पेजवर अधिक व्ह्यूज मिळावण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे आरोपीने सांगितले.