Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांमुळे रश्मिका नेटकऱ्यांवर संतापली

सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांमुळे रश्मिका नेटकऱ्यांवर संतापली

Subscribe

नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या चित्रपटांसोबतच विविध कारणांमुळे देखील वारंवार चर्चेत आहे. रश्मिका सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वारंवार ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, रश्मिकाने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

रश्मिकाने शेअर केली पोस्ट

- Advertisement -

टॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी रश्मिका मंदाना सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. रश्मिकाची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रश्मिकाने तिचा एक फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “काही गोष्टी मला खूप दिवसांपासून त्रास देत आहेत. आता मला वाटतंय की, मी यावर बोलावं. मला वाटतं की, हगे सगळं मला काही वर्ष आधीच बोलायला हवं होतं. मी जेव्हापासून माझ्या करिअरला सुरुवात केली होती. तेव्हापासून मला तिरस्काराचा सामना करावा लागला आहे. मी नेहमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. मी प्रत्येकाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवत नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही की जर तुम्हाला मी आवडत नाही म्हणून तुम्हाला माझ्याबद्दल नकारात्मकता पसरवण्याचा अधिकार आहे.”

त्यानंतर रश्मिकाने तिच्याबाबतीत सुरु असणाऱ्या अफवांबद्दल लिहिलं, “त्यात मी म्हणाली की, मी जे कधी बोलले नाही त्यावरुन माझी मस्करी केली जाते. यावरुन माझं मन दुखावतं.”

- Advertisement -

‘या’ बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकणार रश्मिका
रश्मिका मंदाना नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटामध्ये झळकली होती. आता ती ‘मिशन मजनू’ या हिंदी चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसून येईल. त्याशिवाय रश्मिका टायगर श्रॉफसोबत देखील एका चित्रपटात दिसणार आहे.

 


हेही वाचा :

ध्येयवादी सुनेची गोष्ट – ‘शाब्बास सूनबाई’

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -