घरमनोरंजनशनाया शिकली 'ही' नवीन गोष्ट; फोटो बघून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

शनाया शिकली ‘ही’ नवीन गोष्ट; फोटो बघून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Subscribe

सोशलमिडीयाद्वारे रसिका कायमच फॅन्सची संवाद साधत असते. तीच्याबद्दल जाणून घ्यायला तीचे चाहतेही खूप उत्सुकता असतात. ती आपले व्हीडीओ,फोटो कायम इन्स्टाग्रामवर शेअर करते.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे अभिनेत्री रसिका सुनील. तिनं सध्या या मालिकेला रामराम केला असला तरी सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते आणि सतत नवं काहीतरी शिकत असते. नुकतचं रसिका विमान चालवायला शिकली होती. तीने त्याचा व्हीडीओही सोशलमिडीयावर शेअर केला होता. तीच्या या व्हिडिओला तीच्या चाहत्यांनी पसंती दिली होती. सोशलमिडीयावर चाहत्यांचा अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. विमान चालवायला शिकल्यानंतर रसिकाने आणखी एक कला आवगत केली आहे. रसिकाने नुकताच ‘स्कुबा डायव्हिंगचा‘ कोर्सपूर्ण केला आहे.

- Advertisement -

रसिकाने ‘स्कुबा डायव्हिंगचा’ कोर्सपूर्ण केल्याचे प्रमाणपत्र रसिकाला मिळाले आहे. त्याचप्रमाणे तीला जगातील कोणत्याही स्कुबा डाइव्ह साईटवर ‘स्कुबा डायव्हिंग करण्याचं लायसन देण्यात आलं आहे. याविषयी रसिका म्हणाली, मला कायमच समुद्र,स्कुबा डायव्हींग याविषयी आकर्षण होते. तसेच स्कुबा डायव्हींग करणं हे माझ्या बकेटलिस्टमध्ये होतं. स्कुबा डायव्हींग हा खूप सोपा प्रकार आहे असं मला वाटलं होतं.

- Advertisement -

पण हे शिकण्यासाठी चारशे पानाचे पुस्तक होते. लेखी परिक्षा झाली. खूप टेक्निकल गोष्टी शिकल्या. हा एक जबाबदारीचा खेळ आहे. यात आपल्याबरोबर आपल्या जोडीदाराची काळजी घेणं महत्त्वाच आहे. पाण्याच्या तळाशी स्टारफिश आहेत. वेगवेगळ्या रंगांचे सी अर्चिन्सही पाहिले. पॅसिफिक महासागराचे पाणी खूप थंड आहे. स्कूबा डायव्हिंग करायचे आधीपासूनच मनात होते आणि हे शिकल्याचा फायदाही आहे.

सोशलमिडीयाद्वारे रसिका कायमच फॅन्सची संवाद साधत असते. तीच्याबद्दल जाणून घ्यायला तीचे चाहतेही खूप उत्सुकता असतात. ती आपले व्हीडीओ,फोटो कायम इन्स्टाग्रामवर शेअर करते. सध्या ती फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचे शिक्षण न्युयॉर्कमध्ये घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -