HomeमनोरंजनYashraj Mukhate : 'रसोडे में कौन था?' फेम यशराज मुखाटे अडकला लग्नबंधनात

Yashraj Mukhate : ‘रसोडे में कौन था?’ फेम यशराज मुखाटे अडकला लग्नबंधनात

Subscribe

कोरोना काळात स्वतःच्या वेगळ्या शैलीमुळे घराघरात पोहोचलेला आणि प्रसिद्ध झालेला संगीतकार, गायक म्हणजे यशराज मुखाटे. संवादावरून मजेशीर गाणी बनवून त्याने प्रेक्षकांच्या मनात एकच वेगळं स्थान निर्माण केलं. ‘रसोडे में कौन था?’, ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता’ अशी बरीच मजेशीर गाणी त्याची जगभरात हिट झाली. त्याचे अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यशराज मुखाटे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. असा हा प्रसिद्ध यशराज मुखाटे 28 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकला आहे. त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

यशराजने रजिस्टर पद्धतीने लग्न केले आहे. त्याच्या पत्नीचं नाव अल्पना आहे. यशराजने लग्नाचा फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, आज दोन मोठ्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे अल्पना आणि मी नोंदणी पद्धतीत लग्न केलं. तर दुसरी म्हणजे माझं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे, ‘मन धागा’ याची लिंक बायोमध्ये दिली आहे. यशराजची बायको नक्की कोण आहे याविषयी मात्र काहीही माहिती समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

 यशराजचं नवं गाणं युट्यूबवर रिलीज झाले आहे. यशराज आणि अमित त्रिवेदीचं हे पहिलं गाणं असून नव्या गाण्याची जोरदार चर्चा होत आहे. हे गाणं जसलीन रॉयल, यशराज आणि अमित त्रिवेदीने गायलं आहे. हे गाणं अन्विता दत्तने लिहिलं आहे.

दरम्यान, यशराजच्या चाहत्यांसोबतच शहनाज गिल, अर्चना पूरण सिंग, बिग बॉस फेम अर्चना गौतम, जेमी लीव्हर यांच्यासोबत सुयश टिळक, स्वानंदी टिकेकर, भाग्यश्री लिमये, मैथिली पालकर, मिताली मयेकर या मराठी सेलिब्रिटींनीही यशराज मुखाटेचं अभिनंदन केलं आहे. सोबतच मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने ‘अभिनंदन, कोण आहे ही सुंदरी?’ असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनीही नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.