घरमनोरंजनशेवंता आणि वच्छीचा भन्नाट डान्स एकदा बघाच

शेवंता आणि वच्छीचा भन्नाट डान्स एकदा बघाच

Subscribe

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कुठलंही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या. ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. नकारात्मक भूमिका असलेली वच्छीची व्यक्तिरेखा अगदी खरी वाटते. त्यामुळे या व्यक्तीरेखेवरही प्रेक्षकांनी तितकच प्रेम केलं आहे.

वच्छीच्या व्यक्तिरेखेसोबतच तिचा डान्स देखील तितकाच लोकप्रिय होत आहे. स्वतःच्या मुलाच्या, काशीच्या वरातीत वच्छीचा डान्स सर्व प्रेक्षकांनी पाहिला आणि सगळ्यांना आवडला देखील. त्या डान्सवरचे अनेक मिम्सही व्हायरल झाले.

- Advertisement -

 मालिकेतील शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती वच्छी सोबत वच्छीचा डान्स करतेय. हा व्हिडीओ प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला आहे. नेटिझन्सनी या व्हिडिओला भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अगदी कमी वेळातच या व्हिडिओला ५० हजारापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. वच्छीचा डान्स खूप पॉप्युलर होतोय इतकं मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -