घरताज्या घडामोडीVideo: शेवंता करतेय पाणीपुरीवाल्यांची नक्कल; व्हिडिओ पाहून हसू होईल अनावर

Video: शेवंता करतेय पाणीपुरीवाल्यांची नक्कल; व्हिडिओ पाहून हसू होईल अनावर

Subscribe

'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेतील शेवंता पाणीपुरी विकते आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सर्वच कलाकार सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह आहेत. आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून व्हिडिओ किंवा फोटो शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. काही कलाकारांनी खास चाहत्यांसाठी वेगवेगळे शो देखील सुरू केले आहेत. सध्या सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याने भुरळ घालणाऱ्या एका अभिनेत्रीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ‘रात्री खेळ चाले २’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अपूर्वी नेमळेकर म्हणजे आपल्या लाडक्या शेवंताचा हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमुळे शेवंता पुन्हा एकचा चांगलीच चर्चेत आली आहे. या व्हिडिओत शेवंता पाणीपुरी विकताना दिसत आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. घरच्या घरी तिने पाणीपुरी तयार केली असून ती हुबेहूब स्ट्रीट स्टाइलमध्ये खांद्यावर रुमाल घेऊन पाणीपुरीवाल्यांची नक्कल करत आहे.

- Advertisement -

सध्या लॉकडाऊनमुळे शुटिंग थांबल्याने सर्व कलाकार आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. यादरम्यान ते अनेक पदार्थ तयार करून ते चाहत्यांना दाखवत आहे. यापूर्वी ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’फेम अभिनेता विकी कौशलने देखील पाणीपुरी कशी खायची असते? याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. विकी कौशलचा देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – ऋषी कपूर रणबीरला म्हणायचे, आलिया नको तर ‘या’ व्यक्तीसोबत कर लग्न!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -