Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन शेवंता आणि अण्णा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शेवंता आणि अण्णा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रात्रीस खेळ चाले-3 ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे टिझर देखील प्रदर्शित झाले आहे.

Related Story

- Advertisement -

झी मराठी वाहिनीचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या वाहिनीवरील मालिकांमधील पात्रांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिका पुन्हा पाहायला आवडतात. चाहत्यांच्या प्रेमापोटी आणि मागणीमुळे या मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्यात येणार असून, आता रात्रीस खेळ चाले-3 ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे टिझर देखील प्रदर्शित झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले आणि तुला पाहते रे या मालिकांना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली. झी मराठीवरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी या दोन मालिकांचा टीआरपी सर्वात जास्त आहे. चाहत्यांची पसंती पाहता रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा सुरु होणार आहे. मालिकेच्या या येत्या पर्वात देखील अण्णा नाईक दिसणार आहेत. तसेच, या मालिकेत शेवंता, पांडू हे पात्र देखील दिसण्याची शक्यता आहे. आवडती मालिका परत येणार असल्याने प्रेक्षकवर्ग देखील आनंदी झाले आहेत.

रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील शेवंता आणि अण्णांच्या पात्रांचीही जोरदार चर्चा आहे. यापूर्वी रात्रीस खेळ चाले या मालिकेचे 2 सीझन आले होते. त्याला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.लेखक अभिनेता प्रल्हाद कुडतरकर हा या मालिकेचा निर्माता असून, त्याने यात पांडूची भूमिका साकारली. रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे. अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडूचा “इसारलंय”, “त्या माका काय माहित?” हा डायलॉगही खूप प्रसिद्ध झाला. वच्छी या पात्राचा नाचही प्रसिद्ध झाला होता.

- Advertisement -

 


हेही वाचा – अपहरणकर्ता सांगतोय ‘याकरिता’ केले चिमुकलीचे अपहरण

- Advertisement -