घरमनोरंजनरवीना टंडन आणि एमएम किरवाणी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला पद्मश्री पुरस्कार

रवीना टंडन आणि एमएम किरवाणी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला पद्मश्री पुरस्कार

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार मिळणार असल्याची बातमी समोर आली होती. तेव्हापासून तिचे चाहते तिला पद्मश्री भेटणार असलेल्या दिवसाची वाट पाहत होते. अखेर बुधवारी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडला, ज्यात अभिनेत्री रवीना टंडनला देशाचा सर्वोच्च सन्मान पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रवीनाला हा पुरस्कार देण्यात आला. सध्या या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रवीना ऑलिव्ह रंगाची साडी नेसलेली आणि केसांमध्ये गजरा घातलेली दिसत आहे.

चित्रपटातील योगदान आणि समाजसेवेसाठी रवीनाला मिळाला पद्मश्री पुरस्कार

अभिनेत्री रवीना टंडनला या पुरस्कार भारतीय चित्रपट आणि तिच्या समाजसेवेतील योगदानाबद्दल देण्यात आले आहे. रवीना टंडन 90 च्या दशकापासून हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, त्याशिवाय ती मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणापासून ते समाजातील महिला सक्षमीकरणापर्यंतच्या सामाजिक समस्यांवर काम करते. ‘रवीना टंडन फाऊंडेशन’ या एनजीओच्या माध्यमातून रवीना गरीब मुलांना शिक्षण देण्याचे सामाजिक काम करत आहे.

- Advertisement -

दरम्यान, रवीना टंडन यापूर्वी ‘KGF Chapter 2’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता लवकरच रवीना ‘घुडछडी’ चित्रपटात दिसणार आहे.

ऑस्कर विजेते एमएम किरवाणी यांना देखील पद्मश्री पुरस्कार

अभिनेत्री रवीना टंडन व्यतिरिक्त, ‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एमएम किरवाणी यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एमएम कीरावानी यांच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

माझं मानधन 3 लाख नाही… इंदूरकर महाराजांच्या आरोपावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -