घरताज्या घडामोडीGhudchadi : रवीना टंडन अन् संजय दत्तची सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र

Ghudchadi : रवीना टंडन अन् संजय दत्तची सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र

Subscribe

सिनेमात भरपूर मस्ती, धम्माल आणि रोमान्स पहायला मिळणार आहे. संजय दत्तने त्याच्या इन्स्टाग्रामवर क्लॅपबोर्डसोबतचा फोटो शेअर करत सिनेमाची माहिती दिली आहे.

Ghudchadi : नव्वदच्या दशकात मोठ्या पडद्यावर धम्माल उडवणारी जोडी म्हणजे अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता संजय. ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर येत आहे. संजय दत्त आणि रवीना टंडण यांचा नोमँटिक ड्रामा असलेला घुडचुडी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. राजस्थानच्या जयपूर येथे सिनेमाचे शुटींग सुरू आहे. निर्मात्यांनी सिनेमाच्या एका टिझर व्हिडीओतून सिनेमाच्या मुहूर्ताची एक झलक शेअर केली आहे. दिपक कपूर भारद्वाज आणि बिनॉ गांधी यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. सिनेमात भरपूर मस्ती, धम्माल आणि रोमान्स पहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

- Advertisement -

संजय दत्तने त्याच्या इन्स्टाग्रामवर क्लॅपबोर्डसोबतचा फोटो शेअर करत सिनेमाची माहिती दिली आहे. फोटो शेअर करत संजय दत्तने एका ज्योतिषाला टॅग करत त्याचे आभार मानले आहेत. एका नवीन गोष्टीची सुरूवात तुमच्या उपस्थितीत झाली याचा आनंद आहे. तुमचे आभार असे संजयने म्हटले आहे. फोटोमध्ये संजय दत्त योगा मॅटवर बसून प्राणायाम करताना दिसत आहे.

घुडचडी हा सिनेमा गुलशन कुमार आणि टी सीरीजच्या बॅनरखाली सिनेमा तयार होतोय. भूषण कुमार, कृष्णा कुमार, निधी दत्ता आणि बिनॉय गांधी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. घुडचडी सिनेमा व्यतिरिक्त संजय आणि रवीना केजीएफ चॅप्टर २ मध्ये देखील एकत्र दिसणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जान्हवी, सारा यांनाही सुकेशने दिले होते गिफ्ट ; ED च्या चार्जशीटमध्ये खुलासा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -