Raveena Tandon चे वडील रवी टंडन यांचे निधन; अभिनेत्री म्हणाली, तुम्ही कायम सोबत…

Raveena Tandon father ravi tandon passes away actress share photo writes emotional note
Raveena Tandon चे वडील रवी टंडन यांचे निधन; अभिनेत्री म्हणाली - तुम्ही कायम सोबत असाल

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: रवीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. रवी टंडन हे 87 वर्षांचे होते. मात्र 11 फेब्रुवारी रोजी दुपारी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. रवीनाने फोटो शेअर करुन तिच्या वडिलांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोसह कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही. मात्र, रवी टंडन यांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे चार फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटोमध्ये ती वडिलांसोबत फिरताना दिसतेय. दुसरा फोटो रवीनाच्या बालपणीचा आहे, ज्यामध्ये तिच्या वडीलांनी तिला आपल्या मांडीवर घेत आहेत. तर तिसऱ्या फोटोमध्ये दोघेही एका फंक्शनमध्ये एकत्र बसले आहेत आणि चौथ्या फोटोत रवीना वडिलांना पकडून कॅमेरासमोर पोज देत आहे आणि गालावर किस करत आहे.

फोटो शेअर करत रवीना टंडनने लिहिले की, ‘पप्पा तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहाल. मी नेहमी तुझ्यासारखाच राहीन. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. लव्ह यू बाबा. रवीनाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंटवर शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री नीलम कोठारी यांनी ‘तुम्हाला माझ्या मनापासून संवेदना’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. या कठीण काळातही अनेक सेलिब्रिटींनी रवीना टंडनविषयी प्रेम व्यक्त करत आहेत.

रवी टंडन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. नजराना, मुकद्दर, मजबूर और निर्माण असे अनेक चित्रपट त्यांनी केले. अनहोनी आणि एक मैं और एक तू या चित्रपटांची निर्मितीही केली. रवी टंडनने पत्नी वीणासोबत लग्न केले. या लग्नापासून त्यांना राजीव नावाचा मुलगा झाला. राजीव दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहेत. यासोबतच त्यांना रवीना टंडन ही मुलगी होती, तिचे नाव रवी आणि वीणा टंडन यांच्या नावाने जोडले गेले.


सुपरस्टार रजनीकांतच्या स्वॅगला तोड नाय ! Thalaivar169ची जोरदार घोषणा