घरमनोरंजनRavi Jadhav : "अभिमान वाटतो कारण…",रवी जाधव यांची मुलासाठी खास पोस्ट

Ravi Jadhav : “अभिमान वाटतो कारण…”,रवी जाधव यांची मुलासाठी खास पोस्ट

Subscribe

आपली मुलं उत्तम शिकावीत, असं सर्वच पालकांना वाटतं आणि यासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी मेहनत घेत असतात. कलाकार मंडळीदेखील त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवत असतात. नुकतेच अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकच्या मुलाचे शिक्षण परदेशात पूर्ण झाले. अभिनेत्याने मुलाच्या पदवी प्रदान सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आणखी एका दिग्दर्शकाच्या मुलाचे परदेशात शिक्षण पार पडले असून तो आता पदवीधर झाला आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांचा मुलगा अंश जाधव पदवीधर झाला आहे. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रवी जाधव यांचा मुलगा अंश जाधवने कॅनडातील एका मोठ्या कॉलेजमधून डिजीटल फ्युचर्समध्ये पदवी मिळवली आहे. त्यानिमित्ताने रवी जाधव यांनी लाडक्या लेकासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलाचं भरभरून कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

- Advertisement -

 रवी जाधव यांनी त्यांचा मुलगा अथर्व जाधव याच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अथर्वचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, “पालक म्हणून अभिमानाचा क्षण! माझ्या मुलाने नुकतीच OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजिटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन पदवी पूर्ण केली. आम्ही खूप आनंदी आहोत. त्याला उत्कृष्ट कामगिरी करताना आणि त्याचे ध्येय साध्य करताना पाहणे हा एक अविश्वसनीय प्रवास होता.”
रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी रवी जाधव यांच्या लेकाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या दिग्दर्शनाचा दबदबा निर्माण करणारे लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या कामाने सगळ्यांना भुरळ पाडली. ‘नटरंग’, ‘टाईमपास’, ‘न्यूड’, ‘बालगंधर्व’ यांसारख्या सिनेमातून आपल्या दिग्दर्शनाची छाप पडणारे रवी जाधव यांनी ‘मैं अटल हू’ मधून स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. त्यांच्या ‘ताली’ या सुष्मिता सेनच्या वेबसीरिजची प्रचंड चर्चा झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -