घरमनोरंजनराम चरणसोबत 'RC 15' टीमने दिल्या कियारा-सिद्धार्थला शुभेच्छा; व्हिडीओ व्हायरल

राम चरणसोबत ‘RC 15’ टीमने दिल्या कियारा-सिद्धार्थला शुभेच्छा; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड मधील क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा 7 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. अशातच दिल्लीत त्यांच्या कुटुंबियांसोबत छोटेसे रिसेप्शन आयोजित केल्यानंतर, रविवारी मुंबईत देखील त्यांच्या बॉलिवूडमधील मित्रांसाठी मोठ्या धूमधडाक्यात एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते.

दरम्यान, या रिसेप्शनमध्ये कियाराच्या आगामी ‘RC 15’ चित्रपटातील कलाकार देखील हजेरी लावतील असं म्हटलं जात होतं. मात्र, काही कारणास्तव त्यांना हजर राहता आले नाही. त्यामुळे ‘RC 15’च्या संपूर्ण टीमने कियारा आणि सिद्धार्थला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘RC 15’ टीमने दिल्या कियारा-सिद्धार्थला शुभेच्छा

- Advertisement -

सध्या ‘RC 15’ चित्रपटाच्या टीमचा व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये राम चरण, गणेश आचार्य तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर आणि संपूर्ण टीम दिसत आहे. या खास व्हिडीओमध्ये सर्वांनी कियारा-सिद्धार्थला शुभेच्छा फुलांचा वर्षाव केला आहे. हा सरप्राईस व्हिडीओ कियाराला देखील नक्कीच आवडलं असेल.

‘RC 15’ मध्ये राम चरण आणि कियारा पहिल्यांदा एकत्र

‘RC 15’ या चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकर करत असून राम चरण पहिल्यांदा एस शंकर यांच्यासोबत काम करत आहेत. राम चरण आणि कियारा आडवाणी ही नवी जोडी देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दरम्यान, या सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

कियारा-सिद्धार्थचा रिसेप्शनमधील डान्स व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -