घरताज्या घडामोडीRD Burman birthday: 'पंचम'दा भारतीय चित्रपट संगिताला अजरामर करणारा अवलिया

RD Burman birthday: ‘पंचम’दा भारतीय चित्रपट संगिताला अजरामर करणारा अवलिया

Subscribe

६० ते ८०व्या दशकात त्यांच्या अनेक सुपरहीट गाण्यांनी धमाल उडवली

भारतीय चित्रपटातील गीतांना आपल्या वेगळ्या संगीत धाटणीत मांडणारे अवलिया ‘राहुल देव बर्मन’ म्हणजेच आपले ‘पंचमदा,’ आरडी बर्मन यांचा आज वाढदिवस. (RD Burman birthday) याचनिमित्ताने त्यांच्या आयुष्य प्रवासावरचा हा लेखाजोगा. पंचमदा यांचा जन्म २७ जून १९३९ साली झाला. आपल्या खास स्टाईलच्या संगितामुळे देशातच नाही तर परदेशातही त्यांनी स्वत;ची वेगळी ओळख निर्माण केली. ६० ते ८०व्या दशकात त्यांच्या अनेक सुपरहीट गाण्यांनी धमाल उडवली होती. सलग तीन दशकांपर्यंत हिंदी चित्रपटांवर राज्य करणाऱ्या पंचमदांनी ३३१ चित्रपटांना संगीत दिलं. जे त्यांच्या संगितासाठी जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच ते त्यांच्या गाण्यांसाठीही लोकप्रिय होते. आजही पंचमदांनी संगितबद्ध केलेली गाणी मनाला आनंद देतात. (R D Burman indian movies voice)

- Advertisement -

पंचमदा तत्कालिन ब्रिटीशांच शासन असलेल्या कलकत्ता( कोलकाता)मधील त्रिपुरातील राजेशाही कुटुंबाशी संबंधित होते. त्यांचे वडील सचिन देवबर्मन हे हिंदी चित्रपटातील मातब्बर संगितकारांपैकी एक होते. तर त्यांची आई मीरा देवबर्मन या गीतकार होत्या. पंचमदाचे आजोबा नाबद्विपचंद्र देवबर्मन त्रिपुराचे राजकुमार होते. तर आजी निर्मला देवी मणिपुरच्या राजकुमारी होत्या. पंचमदा यांनी अवघ्या नऊ वर्षांचे असताना पहीले गाण. ‘ऐ मेरी टोपी पलट के आ’ तयार केले. ते गाणं त्यांच्या वडिलांनी १९५६ साली ‘फंटूश’ या चित्रपटात वापरलं. तसेच ‘सर जो तेरा चकराए ,या दिल डूबा जाए’ या लोकप्रिय गाण्याची चाल पंचमदा यांनी लहानपणीच बनवली होती. हे गाणं १९५७ साली गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ चित्रपटात वापरण्यात आलं. चित्रपटात संगितकार म्हणून येण्याआधी पंचमदा ऑक्रेस्ट्रामध्ये हारमोनियम वाजवायचे. पण मुंबईत आल्यानंतर त्यांनी उस्ताद अली अकबर खान आणि पंडीत समता प्रसाद यांच्याकडून तबल्याचे प्रशिक्षण घेतलं.


पंचमदा यांना संगितकार म्हणून १९५९ साली निरंजन नामक दिग्दर्शकाने ‘राज’ या चित्रपटात संधी दिली. पण हा चित्रपट प्रदर्शित झालाच नाही. याचदरम्यान गीता दत्त आणि आशा भोसले यांची गाणी संगीतबद्ध केली. नंतर अशाच प्रकारे एक दोन गाणी संगीतबद्ध करत पंचमदांचा संगितकार म्हणून प्रवास सुरू झाला. त्यानंतर पंचमदांनी कधीच मागे वळून पाहीले नाही. एकापेक्षा एक गाणी संगीतबद्ध करत त्यांनी भारतीय चित्रपटातील संगिताला जगभरात अजरामर केले.

- Advertisement -

हेही वाचा – अभिनेता, दिग्दर्शक आनंद तिवारी ‘या’ अभिनेत्रीसोबत अडकला लग्नबंधनात

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -