‘कारवा’ सिनेमातील ‘मोनिका… ओ माय डार्लिग’ गाणं असु देत किंवा ‘शोले’ चित्रपटातील ‘मेहबुबा, मेहबुबा…’ गाणं असु देत… ही गाणं कानावर पडताच डोळ्यांसमोर उभी राहते ती गोऱ्या वर्णाची, घाऱ्या डोळ्यांची, देखणी, बोल्ड अभिनेत्री हेलन. 50 ते 60- 70 च्या दशकात आयटर्म सॉंगने सर्वांना वेड लावणारी हेलनचा डान्स पाहायला लोक अक्षरश: वेडे होते. हेलनची कंबर थिरकली की पुरूष असो वा स्त्री ही थिरकणारचं एवढे मात्र नक्की.. त्यांची प्रसिद्धी एखाद्या टॉपच्या हिरोईनप्रमाणेच होती. जाणून घेऊयात, बॉलिवूडची पहिली आयटर्म गर्ल असणाऱ्या हेलनविषयी काही खास गोष्टी…
सुरूवातीची परिस्थिती अत्यंत हलाखीच्या –
21 नोव्हेंबर 1938 रोजी म्यानम्यार येथील बर्मामध्ये जन्मलेल्या हेलन यांचे आयुष्य फार संघर्षांनी भरलेले होते. मूळच्या म्यानमार मधील बर्माच्या असणाऱ्या हेलन अॅंग्लो इंडियन कुटूंबातील आहेत. त्यांच्या बाबांचे नाव जॉर्ज डेस्मियर आणि आईचे नाव मार्लेन होते. तिला जॉर्जर नावाचा भाऊ आणि जेनिफर नावाची बहिण होती. त्यांचे वडील दुसऱ्या महायुद्धात मरण पावले. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात त्यांचे वडील वाचू शकले नाही. यानंतर जपानने बर्मावर ताबा मिळवून तेथील लोकांना बाहेर काढले. त्यावेळी हेलनच्या आई गर्भवती होत्या. तीन लेकरांना घेऊन गर्भवती असताना त्या भारताकडे रवाना झाल्या. त्यांनी अनेक जंगले पार केली. रस्त्यातच त्यांच्या आईचं मिसकॅरेज झाले. अखेर रस्ते पार करत आसामला पोहोचताच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, तेव्हा त्यांच्या आणि आईच्या अंगात केवळ हाडे होती. हेलन भारतात आल्या तेव्हा त्या फक्त 3 वर्षांच्या होत्या. त्या बर्माहून 800 किलोमीटर चालत आल्या होत्या. परिस्थिती सुधारल्यावर त्यांचा परिवार कोलकत्ता येथे राहू लागले आणि कालांतराने ते मुंबईला रवाना झाले.
उदरनिर्वाहासाठी केला डान्स –
घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे त्यांना शालेय शिक्षण सोडावे लागले. पोट भरण्यासाठी हेलन यांनी चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. खरं तर, एका फॅमिली फ्रेंड आणि डान्सर कुकूने हेलन यांना डान्स शिकविला होता आणि पहिला ब्रेकही दिला. 1951 च्या ‘शाबिस्तान’ आणि ‘आवारा चित्रपटात कोरस डान्सर म्हणून पहिल्यांदा काम मिळाले. त्यानंतर 1954 मध्ये आलेला ‘अलीफ लैला’ आणि 1955 मध्ये आलेला ‘हुर-ए-अरब ‘सारख्या चित्रपटात ग्रुप डान्स मध्ये दिसल्या. वयाच्या 19 व्या वर्षी हेलनना खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘मेरा नाम चुनचुन’ आयटम सॉंगने. यानंतर हेलन बॉलिवूडची पहिली आयटर्म गर्ल बनली. हेलनने मोजक्याच चित्रपटात काम केले पण, त्यांचे आयटम डान्स आजही तितकेच लोकप्रिय आहेत.
वैवाहिक आयुष्य –
हेलन यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी 28 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या दिग्दर्शक प्रेम नारायण अरोरासोबत लग्न केले, पण लग्नाच्या 18 वर्षानंतर 1974 मध्ये आर्थिक फसवणूक झाल्याने घटस्फोट घेतला. यानंतर ‘काबिल खान’ या चित्रपटादरम्यान सलीम खान यांच्याशी हेलनशी भेट झाली. सलीमही हेलनच्या सौंदर्यावर भाळले आणि त्यांनी त्यांच्याशी लग्न केले.
आजतागायत जवळपास 1000 हून अधिक चित्रपटांमध्ये हेलन यांनी केल्याचे बोलले जाते. त्याकाळी बोल्ड असणे तितके पचनी पडण्यासारखे नव्हते. पण, हेलनच्या बोल्डनेसमध्ये कधीच अश्लीलता दिसून आली नाही, ती त्याच्या आसपासही फिरकली नाही.
हेही पाहा –