घरताज्या घडामोडीअरे देवा! Bigg Boss लाच झाला कोरोना, शो होणार बंद?

अरे देवा! Bigg Boss लाच झाला कोरोना, शो होणार बंद?

Subscribe

बिग बॉससोबत सेटवर असलेल्या सर्व लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे

देशात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. सिनेमा आणि मालिकांच्या सेटवर तर कोरोनाने शिरकाव केलाच आहे. मात्र आता प्रेक्षकांच्या लाडक्या बिग बॉसना (bigg Boss)   देखील कोरोनाने गाठले आहे. स्पर्धकांची सतत काळजी घेणाऱ्या बिग बॉसना कोरोनाची लागण झाली आहे. बिग बॉसचा खरा आवाज असलेले अतुल कपूर (Atul Kapoor)  कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. कोरोनाने थेट बिग बॉसचा खरा आवाजाच दाबला आहे असे म्हणायला हरकत नाही.

बिग बॉसच्या फॅन पेजवर एका पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली. त्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘बिग बॉसच्या आवाजाला कोरोना झाला आहे. बिग बॉसचा खरा आवाज असणारे अतुल कपूर यांना कोरोना लागण झाली आहे. आपण आशा करुया की ते लवकर बरे व्हावेत. त्यांची रिकव्हरी जलद गतीने व्हावी. अतुल कपूर यांच्यासोबत सेटवर असलेल्या सर्व लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे’.

- Advertisement -

आता बिग बॉसच कोरोना पॉझिटीव्ह आल्याने बिग बॉस 15 बंद होणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. बिग बॉसच कोरोना पॉझिटीव्ह आल्याने बिग बॉस 15 दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आला. काही दिवसांपूर्वी बिग बॉसची स्पर्धक देओलिना भट्टाचार्य देखील कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तर अभिजित बुचकलेंना देखील बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याआधी कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

कोण आहेत अतुल कपूर

अतुल कपूर हे बिग बॉसचा खरा आवाज आहे. अतुल हे गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. आजवर त्यांनी अनेक हिंदी, इंग्रजी सिनेमे, वेस्टर्स सिरीयल्ससाठी आजाव दिला आहे. २००३मध्ये आलेल्या जस्सी जैसी कोई नही या मालिकेच्या प्रोमोमध्ये अतुल यांचा आवाज होता. आजही अनेक हिंदी मालिकांच्या प्रोमोमध्ये अतुल कपूर यांचा आवाज ऐकायला मिळतो.


हेही वाचा – Trupti desai: नियमांचे पालन केले, अखेर कोरोनाने गाठलेच – तृप्ती देसाई

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -