‘आदिपुरुष’च्या ‘जय श्री राम’ गाण्याचा रेकॉर्ड; 24 तासांत करोडो व्ह्यूज

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच काही ‘आदिपुरुष’चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. दरम्यान, आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ट्रेलर प्रमाणेच चित्रपटाच्या गाण्याने देखील नवा रेकॉर्ड केला आहे.

‘जय श्री राम राजा राम’ या ‘आदिपुरुष’ चित्रपटातील पहिल्या गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. हे गाणं अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्याचे गीतकार मनोज शुक्ला आहेत. ‘जय श्री राम’ या गाण्याला अवघ्या 24 तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळाल्या असून या गाण्याचा व्हिडीओ एका दिवसात यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ बनला आहे.

अजय-अतुल यांच्यासह 30 जणांच्या कोरस टीमने लाइव्ह परफॉर्म केल्यावर हे गाणे लॉंच करण्यात आले. मुंबईमध्ये अनोख्या पद्धतीने हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

‘आदिपुरुष’ 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास आणि कृती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 


हेही वाचा :

राजकारणात कोणीही कोणाचे… सचिन पिळगावकरांचं हे विधान नेमकं कुणासाठी?