दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील ‘त्या’ दृश्यांमुळे रेखा आणि आलिया झाल्या ट्रोल

नुकतेच दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता- अभिनेत्रींनी या सोहळ्याला हजेरी लावली. पण या सोहळ्यातील एका दृश्यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहे. या दृश्यांमुळे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रेखाला ट्रोल करण्यात येत आहे.

Rekha and Alia became trolls due to 'those' scenes at the Dadasaheb Phalke award ceremony

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच मुंबईत भारतीय चित्रपटसृष्टीचा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अनुपम खेर ते ‘कंतारा’ अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी, रश्मी देसाई, वरुण धवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर आलिया भट्ट आणि हिंदी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखा या दोघीही या सोहळ्याला उपस्थित होत्या. पण या सोहळ्यात या दोघींच्या बाबतीत असे काही घडले की, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या दोघींना सुद्धा ट्रोल करण्यात येत आहे.

‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ पुरस्कार सोहळ्यामधील अभिनेत्री आलिया भट्ट आणि रेखा या दोघींचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला या दोघीही एकमेकींना भेटून गप्पा मारताना दिसत आहेत. तर यानंतर आलिया आणि रेखा या दोघीही एकमेकींच्या तोंडासमोर आल्याने अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. हा व्हिडीओ पाहून एक नेटकरी म्हणाला, “असं वाटलं की लिप किस करणार आहेत.” तर एकाने म्हटले की “आलिया किती चिपकते आहे.” तर एकाने “ना सिंदूर लावलं आहे, ना मंगळसूत्र. त्यावर पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. असं मी केलं असते तर माझ्या सासूने मला टोमणे मारले असते”, अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, आलिया भट्ट आणि रेखा या दोघींच्या साडीचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसत आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये आलिया भट्ट पांढऱ्या साडीमध्ये अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तर तिचे चांदीचे कानातले आणि छोटी बिंदीमध्ये आलियाचे लूक खूपच आकर्षक दिसत आहे आणि रेखाने सुद्धा नेहमीप्रमाणेच केसांमध्ये गजरा, मोठे कानातले घालून कांजीवरम साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

हेही वाचा – चेंबूर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आलियाचा पती अभिनेता रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. रेखाला तिच्या ‘चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदानासाठी’ विशेष पुरस्कारही मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)