संजय लीला भन्साळीच्या ‘हीरामंडी’मध्ये रेखा साकारणार मुख्य भूमिका

या चित्रपटाची जेव्हापासून अनाउंसमेंट करण्यात आली आहे, तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा होत आहे. आता अशी बातमी समोर या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखाला सुद्धा कास्ट करण्यात येणार आहे

बॉलिवूडचे सुप्रसिद्धा दिग्दर्शक संजय लीला भंसाळी आपल्या भव्य चित्रपटांमुळे ओळखले जातात. येत्या काळात ते ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘हीरामंडी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची जेव्हापासून अनाउंसमेंट करण्यात आली आहे, तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा होत आहे. आता या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखाला सुद्धा कास्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे रेखाचे चाहते आता ‘हीरामंडी’ चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

‘हीरामंडी’मध्ये रेखाची भूमिका
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय लीला भंसाळीचा चित्रपट ‘हीरामंडी’मध्ये रेखाला कास्ट करण्यात आलं आहे. तसेच या चित्रपटात रेखाची मुख्य भूमिका असणार आहे. ‘हीरामंडी’मधील रेखाची भूमिकेला वेगळे लिहिण्यात आलं आहे. तसेच असं म्हणटंल जात आहे की, रेखा आणि संजय लीला भंसाळीला एकमेकांसोबत काम करण्याची खूप इच्छा होती. या दोघांनीही याआधी एकत्र काम केलेले नाही. ‘हीरामंडी’ चित्रपटाच्या माध्यमातून दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.

‘हीरामंडी’ चित्रपटाचे बजेट
नेटफ्लिक्सने ‘हीरामंडी’ चित्रपटासाठी २०० करोड रूपयांचे बजेट दिलेले आहे. सूत्रांच्या मते, एक दिग्दर्शक म्हणून संजय लीला भंसाळी जवळपास ६०-६५ कोटी फी वसूल करणार आहेत.तसेच बाकी पैसे चित्रपटाच्या निर्मितीसाठी लागणार असून इतर चित्रपटातील सर्व कलाकारांना दिले जातील.

‘हीरामंडी’चित्रपटाची कथा
‘हीरामंडी’ चित्रपटामध्ये हुमा कुरैशा आणि सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला आणि ऋचा चड्ढा दिसणार असून चित्रपट
‘हीरामंडी’ची कथा भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनाच्या दरम्यान वैश्यांनवर झालेल्या अत्याचारावर आधारित असणार आहे.’हीरामंडी’ हा संजय लीला भंसाळींचा खूप जुना प्रोजेक्ट आहे.चित्रपटात प्रेम, विश्वासघात आणि राजकारण हे सर्व पाहायला मिळेल.


हेही वाचा :मुक्ता बर्वेच्या ‘वाय’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस