घरमनोरंजनवारकऱ्यांच्या मनातील भावना दर्शवणारा 'आसावला जीव' म्युझिक व्हिडिओ रिलीज

वारकऱ्यांच्या मनातील भावना दर्शवणारा ‘आसावला जीव’ म्युझिक व्हिडिओ रिलीज

Subscribe

सलग दुसऱ्या वर्षीही आषाढी एकादशी विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाविना जाणार असल्यानं वारकरी आसावले आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱया वर्षी वारी होणार नसल्यानं वारकरी आणि पंढरीच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीला गाठभेट होऊ शकणार नाही. म्हणूनच वारकऱ्यांच्या मनातली भावना मांडण्यासाठी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजाने सजलेला “आसावला जीव” हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ आषाढी एकादशीनिमित्त सागरिका म्युझिक आपल्यासाठी घेऊन आले असून हे गाणं अनिरुद्ध जोशीवरच चित्रित करण्यात आले आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन अनिरुद्ध-अक्षय (अनिरुद्ध जोशी – अक्षय आचार्य) यांच आहे. संगीत संयोजन अमित पाध्ये यांनी केलं आहे तर हॅण्डलॉक इव्हेंट अँड फिल्म्सनं या व्हिडीओचे चित्रीकरण केले आहे.शेकडो किलोमीटर चालत जाऊन पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहणं, चंद्रभागेत स्नान करणं ही कित्येक शतकांची आपली परंपरा आहे. मात्र करोना विषाणूनं या परंपरेत खंड पाडला आहे.(Release of ‘Asavala Jeev’ music video showing the feelings of Warakaris)

- Advertisement -

काही वाऱ्या, पालख्या पंढरीत जाणार असल्या तरी वारकऱ्यांना घरी राहूनच विठूनामाचा गजर करावा लागणार आहे. सलग दुसऱ्या वर्षीही आषाढी एकादशी विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाविना जाणार असल्यानं वारकरी आसावले आहेत. हीच भावना या म्युझिक व्हिडिओतून मांडण्यात आली आहे.


हे हि वाचा – नात्यांची मनोरंजक सफर घडविणारा ‘सोयरीक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -