Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सत्यमेव जयते 2' चे रिलीज लांबणीवर !

जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’ चे रिलीज लांबणीवर !

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला नाकी नऊ आणले आहे. यामुळे आर्थिक स्थिती ढासाळली असून लोकांचा जीव आता मेटाकुटीला आला आहे. बॉलिवूडलाही याचा मोठा फटका बसत आहे. अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून काहींनी ओटीटी माध्यमांकडे आपली पावले वळवली आहे. अशातच आता अभिनेता जॉन अब्राहम याचा बहूप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’ याची रिलीज डेट पुन्हा बदलण्यात आल्याची घोषणा चित्रपटाच्या टिम मेंबर्सने केली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याचे संगितले आहे.
‘सत्यमेव जयते 2’ चित्रपट १३ मे ला ईद च्या मुहूर्तावर प्रदर्शित करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षी ओक्टोंबर २०२० मधे गांधी जयंतीच्या दिवशी चित्रपट रिलीज करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता देशभरामध्ये संपूर्ण चित्रीकरण आणि सिनेमा गृह बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले होते त्यामुळे ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाचे  प्रदर्शन रोखण्यात आले. अद्याप चित्रपट कधी रिलीज होणार याची  अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

- Advertisement -

मिलाप झवेरी यांच्या दिग्दर्शना अंतर्गत तयार झालेल्या  ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात जॉन अब्राहम, दिव्या खोसला यांच्या मुख्य भूमिका असणार आहे. तसेच जॉन अब्राहम चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. २०१८ मध्ये आलेला चित्रपट ‘सत्यमेव जयते’ च्या  यशानंतर  आता प्रेक्षक दुसर्‍या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे कदाचित मेकर्सना चित्रपट ओटीटी वर रिलीज करायची  वेळ येऊ शकते असे दिसत आहे.


हे हि वाचा – Corona viras:अभिनेता कुमुद मिश्रा यांना कोरोनाची लागण,उपचाराकरिता रुग्णालयात दाखल

- Advertisement -